Thu, Jun 4, 2026
Close

Recent Posts

क्रीडा

संचिता बाबरचे राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत दमदार यश.

संचिता बाबरचे राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत दमदार यश.
Ashok Ithape
  • PublishedMay 10, 2025

मुलींच्या महाराष्ट्र संघात पहिला क्रमांक.

भुईंज : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील किकली या ग्रामीण गावातून पुढे आलेल्या संचिता सुनील बाबर हिने राष्ट्रीय पातळीवरील धनुरविद्या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.

सध्या भुईंज येथे वास्तव्यास असलेली संचिता हिने नुकतीच आठवीची परीक्षा दिली असून, शिक्षणाबरोबरच धनुरविद्या आणि कुस्ती खेळांमध्येही उत्कृष्टता साधली आहे. तिने ओम श्री अकॅडमी वाई येथून प्रशिक्षण घेत, राष्ट्रीय स्पर्धा मद्ये गुजरात व राज्यस्तरीय स्पर्धेत डेरवण येथे दमदार कामगिरी केली आणि तिची निवड महाराष्ट्र राज्य संघात झाली.

दिनांक एक ते तीन मे रोजी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (A S I) पुणे येथे झालेल्या सिलेक्शन ट्रायल मध्ये कुमारी संचिता सुनील बाबर हिचे संपूर्ण भारतातून पहिल्या रँक ने सिलेक्शन झाले येथून पुढे ती इंडियन आर्मी कडून खेळणार आहे.

सिलेक्शन ट्रायल खूपच अवघड होती तरी तिने सर्व अडथळे पार करून संपूर्ण भारतातून पहिला क्रमांक प्राप्त केला आहे.देशातील मुलींमद्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्याचा झेंडा उंचावला.
खेळातील ऊर्जा, चिकाटी, आत्मविश्वास आणि संघभावना ही तिच्या यशामागील खरी ताकद ठरली आहे. या यशामध्ये तिच्या प्रशिक्षक प्रणित सुतार सर यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. ती सध्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज येथे शिक्षण घेत असुन तिच्या शाळेचे पाठबळ हेही तिच्या यशाचे आधारस्तंभ ठरले.
संचिता ही डॉ. श्री. सुनील बाबर व डॉ सौ. अंजुषा बाबर यांची कन्या असून,पत्रकार हेमंत बाबर यांची पुतणी आहे. सीमित संसाधनांतून पुढे येत तिने मोठे यश मिळवले आहे.

या घवघवीत यशामुळे संचिताने आपल्या गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा स्वाभिमान उंचावला आहे.

तिच्या या प्रेरणादायी कामगिरीमुळे संपुर्ण किकली गावात, वाई तालुक्यात आणि सातारा जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. किकलीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व स्थानिक ग्रामस्थ, कुटुंबीय आणि शिक्षकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!