Thu, Jun 4, 2026
अध्यात्म

भुईंज येथे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक वाचन, भजन, किर्तन महोत्सव

भुईंज येथे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक वाचन, भजन, किर्तन महोत्सव
Ashok Ithape
  • PublishedFebruary 2, 2024

भुईंज l प्रतिनिधी:

भुईंज येथे बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी ते बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ज्ञानसत्र कृष्णाकाठावरील व्याख्यानमाला संपन्न होणार दररोज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक वाचन, भजन, किर्तन महोत्सव यासाठी कृष्णाकाठ गजबजणार.

व्याख्यान मालेसाठी खासदार श्रीनिवासजी पाटील, शिक्षण संचालक महेश पालकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, वाईचे प्राताधिकारी राजेंद्र जाधव, बी.डी.ओ नारायणराव घोलप, सहाय्यक निबंधक अनिल क्षीरसागर आणि नामवंतांची व चाकोरी बाहेरचे साहित्यीक परिसंवाद व्याख्याने होणार असल्याची माहिती संयोजक ज्ञानेश्वरी पारायण मंडळ भुईज व भुईज प्रेस क्लव यांच्यावतीने देण्यात आली.

हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ ऋषी आचार्य भृगुमहर्षी यांच्या आश्रमात व संत वाहणा-या कृष्णामाई काटावर क्षेत्र नारायणपूरचे विश्वचैतन्य प. पू. सद्गुरू नारायण महाराज (आण्णा) यांच्या कृपाशिर्वादाने यंदा या पारायण सोहळयाचे ४६ वे वर्ष असून गामस्थ, वारकरी, सेवेकरी, वाचकांच्या सहभागाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे. तर यातील प्रवचनाऐवजी सुरू केलेली ज्ञानसत्र कृण्णाकाठावरील व्याख्यानमाला बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी ते १४ फेबुवारी पर्यंत संपन्न होत आहे. या पारायण सोहळ्यासाठी १०० हून अधिक महिला वाचकांनी नोंद केली असून प्रचंड उत्साह व श्रद्धा आणि भक्तीचा संगमच आचार्य मृगुऋषी मठावर अनुभवयाला मिळणार आहे.

या सोहळ्याचे पार्श्वभूमीवर भुईंज गावात ज्ञानेश्वरी पारायण मंडळाने स्वागत कमान उभारून तयारी पूर्ण केली आहे. या दरम्यान सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी जेष्ठ संत साहित्यीक व नामवंत व्यक्ते मा. आमदार उल्हासदादा पवार यांचा मानपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. तर विविध क्षेत्रातील मान्यवरांचाहि सन्मान खा. श्रीनिवासजी पाटील यांच्या हस्ते व माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व श्री क्षेत्र नारायणपूरचे पोपट महाराज स्वामी व संस्थानचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर यांच्या उपस्थितीत होणार आहे. याच वेळी भुईंजचे सुपुत्र व प्रसिद्ध चित्रकार प्रा. सुजय शेवते यांच्या चित्रांचे प्रदर्शन व प्रकट मुलाखत होणार आहे. या सप्ताहात मान्यवर अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर भेटी देणार आहेत.

वसंत पंचमी दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता सोहळयाची सांगता काल्याच्या किर्तनाने होणार आहे. या सोहळयात गावातील जेष्ठ नागरिक विविध क्षेत्रातील खेळाडू, गुणवंत विद्यार्थी यांचा गौरव होणार आहे.

भुईंज च्या पारायण सोहळ्यात संत साहित्यिक व जेष्ठ नेते उल्हासदादा पवार यांचा होणार सन्मान
मानपत्र देऊन होणार जीवनगौरव या तमाम वारकरी व भुईंज ग्रामस्थांच्या निमंत्रण स्वीकारून उल्हासदादा पवार उपस्थित राहणार, पारायणं मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग शेवते,दत्त सेवेकरी रामदासबापू जाधव,आनंद जाधवराव,जेष्ठ नागरिक संघाचे जगन्नाथ दगडे,व प्रेस क्लबचे संस्थापक जयवंत पिसाळ आदींनी निमंत्रण दिले.

 

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!