बावधन ता.वाई येथील साहित्यिक, कवी डॉ जनार्दन भोसले यांना २०२३ या वर्षीचा ‘राज्यस्तरीय महात्मा फुले साहित्य गौरव पुरस्कार’
भुईंज :- महेंद्र जाधव
महात्मा फुले यांच्या पुरंदर तालुक्यातील खानवडी
या मूळ गावी १६ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनात डाॅ. जनार्दन भोसले यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.
संमेलनाच्या अध्यक्ष पदी कवयित्री डॉ. स्वाती शिंदे-पवार होत्या. स्वागत अध्यक्ष ह भ प जगदीश महाराज उंद्रे होते तर साहित्य संमेलनाचे उदघाटन भा ज पा चे पुरंदर चे नेते बाबाराजे जाधवराव होते, त्याच्या हस्ते मानपत्र देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण, कला, साहित्य, सामाजिक, पर्यावरण व क्षेत्रात गेली अनेक वर्ष सामाजिक बांधिलकी जोपासून काम करीत असल्याने साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल डॉ. जनार्दन भोसले यांना या वर्षीचा “महात्मा फुले साहित्य गौरव पुरस्कार” देऊन बाबाराजे जाधवराव यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
महात्मा फुले आणि सिंधूताई सपकाळ माई यांच्या कर्म भूमीत हा सत्कार होणे हे माझे भाग्य असल्याची भावना डॉ. भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.
साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक कवी, लेखक, पत्रकार व्याख्याते दशरथ यादव व त्यांच्या संयोजन समितीने उत्कृष्ट नियोजन केले.कवी संजय सोनवणे, दीपक भोंगळे, पहिल्या सत्राचे सूत्र संचालन सुनील लोणकर यांनी केले. तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रा अशोक शिंदे सर,डॉ डी बी गायकवाड, विनय कुलकर्णी, सरपंच अशोक बापू यादव, सुनील धिवर, पत्रकार, राजकीय मान्यवर, ग्रामस्थ, कवी, कवयित्री, लेखक उपस्थित होते.













