Mon, Jun 15, 2026
Close

Recent Posts

आरोग्य

बेल एअर हॉस्पिटलचा भुईंजमध्ये बाह्य रुग्ण विभाग

बेल एअर हॉस्पिटलचा भुईंजमध्ये बाह्य रुग्ण विभाग
Ashok Ithape
  • PublishedDecember 5, 2023

महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये बुधवारपासून प्रारंभ

भुईंज: शासकीय आरोग्य विमा योजनेसह सर्वच विमा कंपन्यांच्या योजनांचा लाभ देण्यासोबत सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असणाऱ्या वाई येथील बेल एअर हॉस्पिटलचा बाह्य रुग्ण विभाग बुधवार दि. ६ डिसेंम्बर पासून भुईंज येथील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये सुरू होत आहे, अशी माहिती जन संपर्क अधिकारी संदीप बाबर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या बेल एअर हॉस्पिटलमध्ये सर्वच प्रकारच्या तपासण्या, शस्त्रक्रिया आणि उपचार सुविधा आहेत. या ठिकाणी अल्प व माफक दरात रुग्णसेवा होत असते. या सेवेचा विस्तार वाई तालुक्याच्या पूर्व भागात व्हावा या उद्देशाने भुईंज येथील कारखाना कॉर्नर येथील चिकणे रेस्टो शेजारील महालक्ष्मी अपार्टमेंमध्ये ओपीडी सुरू करीत आहोत.

या ठिकाणी स्त्री रोग तज्ञ डॉ.जितेंद्रसिंह रजपूत (MBBS, MD) प्रत्येक सोमवार, बुधवार, शनिवारी.
जनरल फिजिशियन डॉ. सुभाष घेवारी (MBBS, MD) प्रत्येक गुरूवारी.
बाल आरोग्य तज्ञ डॉ. शयान पावसकर (MBBS, DCH, DNB) प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी माफक अशा १०० ₹ फिमध्ये आरोग्य तपासणी करणार आहेत.

ओपिडीची वेळ दररोज दुपारी ३ ते ५ अशी असून गंभीर रुग्णांना हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेद्वारे वाई येथील अत्याधुनिक सर्व सोईनी युक्त अशा बेल एअर हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार केले जाणार आहेत.
बेल एअरद्वारे निर्माण केलेली ही आरोग्य सुविधा वाई तालुक्याच्या पूर्व भागासाठी आरोग्यसेवा देणारे महत्वपुर्ण व दिलासादायी केंद्र ठरणार असून त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असेही आवाहन बाबर यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!