Mon, Mar 2, 2026
कृषी वार्ता सहकार

भुईंज विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस प्रतापगड साखर कारखान्याकडे गळीतास पाठवावा

भुईंज विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस प्रतापगड साखर कारखान्याकडे गळीतास पाठवावा
Ashok Ithape
  • PublishedAugust 13, 2024

यंदाच्या गळीत हंगामासाठी भुईंज विभागातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस प्रतापगड साखर कारखान्याकडे गळीतास पाठवावा असे आवाहन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

भुईंज l प्रतिनिधी:

भुईंज तालुका वाई येथील भुईंज विकास सेवा सोसायटीच्या हॉलमध्ये झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते यावेळी मोहनआबा भोसले, भुईंजचे सरपंच विजय वेळे, गजानन भोसले, वाई तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते संतोषशेठ शिंदे, प्रगतशील शेतकरी राजेंद्र गायकवाड, अजिंक्यतारा उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन नामदेव सावंत, माजी चेअरमन सर्जेराव सावंत रामभाऊ जगदाळे, राजू शेडगे, संचालक नितीन शिंगटे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी विलास पाटील, प्रतापगड साखर कारखान्याचे शेती अधिकारी लालसिंग शिंदे, धनंजय शिंगटे, भुईज मधील प्रगतशील शेतकरी प्रभाकर भाऊ भोसले, भुईंज विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मदन शिंदे,व्हाईस चेअरमन नारायणराव धुरगुडे, श्रीमंत सुरसिंग जाधवराव, भुईंज चे माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव, देगाव चे प्रगतशील शेतकरी रमेश इथापे, आदी मान्यवर व वाई तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. शेतकरी सभासदांच्या वतीने महाराजसाहेबांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शेतकरी बांधवांच्या मागील गळीत हंगामातील ऊसतोडी संदर्भातील समस्या ऐकून घेवून चालु हंगामात सर्व प्रश्न सोडवणार असल्याचे अभिवचन दिले. यंदा वाढीव ऊसतोड कामगार यंत्रणाही देणार असल्याचे सांगितले. येत्या हंगामात शेतातील शेवटचं टीपरं संपेपर्यंत कारखाना बंद करणार नाही, तसेच या भागातून शेतकरयांची कोणतीही कसल्याही प्रकारची तक्रार येता कामा नये अशी कडक शब्दात प्रतापगड कारखान्याच्या संबंधीत ऊस तोडणी यंत्रणा यांची कानउघाडणी केली. व कारखाना प्रशासनास योग्य त्या सुचना दिल्या.

बैठकी दरम्यान आमदार छ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, मी कोणत्याही कारखान्याशी स्पर्धा करणार नाही. इतरांसोबत योग्य तो दर देईन. तुमचा एकही पैसा तुम्हाला द्यायचा ठेवणार नाही असा विश्वास शेतकर्यांना दिला ,तसेच
यंदाच्या गळीत हंगामासाठी या भागातील जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकरयांनी प्रतापगड साखर कारखान्याला ऊस घालावा. जी रीकव्हरी असेल त्या रिकव्हरीप्रमाणे जो दर निघेल तो दर देणार असल्याचेही छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठकी दरम्यान जाहीर केले.

ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी दिपावलीसाठी साखर मिळावी या मागणीला ही सकारात्मक प्रतिसाद देत.प्रतापगड व्यवस्थापन विषेश बैठक घेवून,संस्थेच्या सद्यपरीस्थीतीवर विचार करून दिपावलीला साखर वाटपसाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले.

या सहविचार बैठकीसाठी अजिंक्यतारा-प्रतापगड कारखान्याचे आजी-माजी पदाधिकारी, तसेच भुईंज गटातील शिरगाव, देगाव, आसले, जांब, पाचवड, उडतारे, किकली, काळंगवाडी, गोवेदीगर, खोलवडी, वाकणवाडी, मापरवाडी, लगडवाडी , बेलमाची, निकमवाडी, भुईंज, चिंधवली, खडकी, भिवडी, विरमाडे,कळंबे या गावातील ऊसउत्पादक शेतकरी उपस्थीत होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!