Mon, Mar 2, 2026
कृषी वार्ता

ग्रामीण भागातील तरूणांनी शेती व्यवसायाकडे कार्पोरेट व्यवसाय म्हणून पहावे – प्रशांत शिंगटे

ग्रामीण भागातील तरूणांनी शेती व्यवसायाकडे कार्पोरेट व्यवसाय म्हणून पहावे – प्रशांत शिंगटे
Ashok Ithape
  • PublishedJuly 3, 2024

भुईंज l प्रतिनिधी:

ग्रामीण भागातील तरूणांनी शेती व्यवसायाकडे कार्पोरेट व्यवसाय म्हणून पाहिल्यास शेती आणि शेतकरी यांना आग्रगण्य ठरवण्यात सर्वाना भाग पडेल. यासाठी शेतीला दुय्यम दर्जा देण्यापेक्षा त्यात वेगवेगळे प्रयोग करत स्पर्धेला सामोरे जाऊ या असे प्रतिपादन खडकी ता. वाई येथील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त प्रशांत शिंगटे यांनी वाई येथे कृषी दिनानिमत्त वोलताना केले.

वाई पंचायत समितीच्यावतीने नुकत्याच वाई तालुक्यातील खडकी येथील प्रयोगशील युवा शेतकरी व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा यंदाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळालेले प्रशांत भिकू शिंगटे यांना कृषी दिनानिमित्त सन्मानित करून उपस्थिती शेतकरी वर्गापुढे संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी विजयकुमार परीट होते तर कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे शास्त्रज्ञ डॉ. भूषण यादगिरवार, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रशांत शिंगटे पुढे म्हणाले की शेती हा व्यवसाय फक्त काम नसणा-यांनी व अशिक्षीत लोकांनी । करावा हा गैरसमज तीन दशकापूर्वी माझ्या खडकी येथील पन्नास माणसांच्या एकत्रित कुंटुंवाने सिद्ध केले. ऊस हळद आले या नगदी पीकांच्या पलिकडे जावून मी कृषी पदवीधर झाल्यानंतर शेतीतील प्रयोग व वाजारपेठा यांच्या अभ्यासकरून खडकी परिसरातील शेती आणि शेतकरी विकसीत केला. या अनुभवावर नवोदित तरूण शेतकरी यांनी गावातच सामुदायिक शेतीचा अवलंब करावा व मजूर टंचाई हा विषय वाजूला ठेवावा असे हि ते म्हणाले. प्रारंभी प्रशांत शिंगटे यांचा महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, सेवागिरी देवस्थानचा आदर्श शेतकरी पुरस्कार, उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्थेचा कृषीउत्कर्ष पुरस्कार २०२४ यांसह विविध मिळालेल्या पुरस्काराबद्दल सन्मानित करण्यात आले.

कार्यकमास वाई पंचायत समितीचे सर्व अधिकारी, पाचवड येथील प्रयोगशील शेतकरी अनिल गायकवाड यांच्यासह कृषी विभागाचे सर्व अधिकारी निमंत्रीत शेतकरी कृषी पर्यवेक्षक मंडल कृषी अधिकारी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा व सोयाबीन पीक प्रत्यक्षीकातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुत्र संचालन प्रदीप देवरे यांनी केले तर आभार शांताराम गोळे यांनी मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!