नेतृत्वगुण जपणारे आदर्श उद्योजक; रामदासशेठ इथापे….
![]()
चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणे नसते. उंच भरारी घेणाऱ्यांना, आभाळाचे ओझे नसते…
कृष्णाकाठच्या समृद्ध सामाजिक परंपरेला आणखी उंच उंच नेणारे सामाजिक कार्यकर्ते व किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, यशराम मसाले प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक तसेच आमदार मकरंदआबा पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील यांचे कट्टर समर्थक, देगावचे सुपुत्र रामदासशेठ इथापे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना संकल्प न्यूज मराठी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील रामदासशेठ यांनी सुरुवातीपासूनच समाजसेवेचा वसा जपला. विद्यार्थी दशेतही इतरांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. पुढे युवावस्थेतही सामाजिक बांधिलकी जपण्याचा बाणा त्यांनी अखंड सुरू ठेवला. नोकरी करण्याऐवजी इतरांना नोकरी देण्यात मिळणारा आनंद घेण्यासाठी त्यांनी यशराम मसाले या उद्योगसमूहाची स्थापना केली.
त्या माध्यमातून व्यावसायिक भरारी घेतानाच अनेकांसाठी ते आधारवड ठरले. मराठी मनुष्य व्यवसायात फारसा यशस्वी होत नाही या समजुतीला छेद देत यशराम मसाले या कंपनीची त्यांनी केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे.
मळवाट सोडून नवा हमरस्ता निर्माण करणारे कर्तुत्ववान व्यक्तिमत्व म्हणून उद्योग- व्यवसाय क्षेत्रात त्यांची ख्याती आहे. व्यावसायिक घोडदौडीच्या बरोबरीनेच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. विविध सामाजिक उपक्रमांना मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ही ते परिचित आहेत.
समाजकारणाच्या बरोबरीनेच राजकीय क्षेत्रातही त्यांनी उत्तम प्रगती प्राप्त केलेली आहे. ग्रामपंचायत, वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून त्यांनी केलेले कार्य निश्चितच संस्मरणीय आहे. शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे, तो जगला पाहिजे – वाचला पाहिजे आणि वाढलाही पाहिजे या भूमिकेतून नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कल्याणासाठी विविध योजना राबवण्यात ते अग्रेसर होते.
त्यांचे हे कार्य पाहून वाई- महाबळेश्वर – खंडाळा या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विधानसभा मतदारसंघाचे नेते जननायक आमदार मकरंदआबा पाटील यांनी त्यांना किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर संचालक पदाची संधी दिली. त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. पाटील बंधूंच्या नेतृत्वाखाली सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात रामदासशेठ इथापे कार्यरत आहेत.
आगामी काळातही त्यांना निश्चितच उत्तमोत्तम संधी मिळेल व आपले कर्तुत्व सिद्ध करण्यास ते मागे- पुढे पाहणार नाहीत याची खात्री संपूर्ण वाई तालुक्यास आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व व झुंजार कर्तृत्व अशी ख्याती असलेल्या या नेतृत्वास भविष्यातील उज्वल वाटचालीसाठी वाढदिवसाचे औचित्य साधून संकल्प न्यूज परीवरातर्फे हार्दिक शुभेच्छा.













