Thu, Jun 4, 2026
कृषी वार्ता

कांद्याची आवक सुरळीत ठेवत, ग्राहकांना कांदा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंत कांद्यावर प्रतिबंध लागू केले

कांद्याची आवक सुरळीत ठेवत, ग्राहकांना कांदा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंत कांद्यावर प्रतिबंध लागू केले
Ashok Ithape
  • PublishedDecember 12, 2023

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2023

देशातल्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी, केंद्र सरकारने, कांद्याच्या निर्यातीवर आठ डिसेंबर 2023 ते 31 मार्च 2024 या काळात, कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. खरीपाचे पीक येण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन,तसेच, निर्यात होणाऱ्या कांद्याची गुणवत्ता,जागतिक परिस्थिती जसे की तुर्कीये, इजिप्त आणि इराण या देशांनी घातलेले व्यापार आणि बिगर व्यापारी निर्बंध, या सगळ्याचा विचार करत सरकारने हा निर्णय घेतला आहे. या घडामोडींचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, यासाठी, केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून मूल्य स्थिरिकरण निधी अंतर्गत सातत्याने कांद्याची खरेदी करत आहे.

चालू आर्थिक वर्षात, सरकारने एनसीसीएफ आणि नाफेड या दोन्ही संस्थांना, सात लाख टन कांदा, राखीव साठा म्हणून खरेदी करण्यास सांगितले आहे. आतापर्यंत सुमारे 5.10 लाख टन धान्याची खरेदी करण्यात आली असून उर्वरित खरेदीचे काम सुरू आहे. खुल्या बाजारपेठेतील विक्री आणि ग्राहकांना थेट किरकोळ विक्रीद्वारे सरकारने खरेदी केलेल्या कांद्याची सतत उच्च किंमतीच्या बाजारपेठेत विकला जात आहे. साठयामधून काढण्यात आलेल्या 2.73 लाख टन कांद्यापैकी सुमारे 20,700 मेट्रिक टन कांद्याची विक्री 2,139 किरकोळ केंद्रांद्वारे 213 शहरांमधील किरकोळ ग्राहकांना करण्यात आली आहे. सरकारच्या बहुआयामी हस्तक्षेपांमुळे, कांद्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 17 नोव्हेंबर रोजी असलेल्या प्रति किलो 59.9 रुपयांवरून 8 डिसेंबर रोजी प्रति किलो 56.8 रुपयांपर्यंत कमी झाली आहे.

29 ऑक्टोबर रोजी सरकारने कांद्याच्या निर्यातीसाठी आणि त्याच वेळी कांद्याच्या राखीव साठ्याचा उपयोग करण्यासाठी,  प्रति टन 800 अमेरिकन डॉलर्स इतके किमान निर्यात मूल्य लागू केले. हे निर्यात मूल्य, कांद्याच्या निर्यातीचे प्रमाण कमी करण्यात प्रभावी ठरले असले तरी, जागतिक परिस्थिती आणि खरीप पिकाला होत असलेल्या विलंबामुळे, मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात सुरू राहिली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!