विकासाभिमुख परंपरेची देगाव पंचायतीची सात दशके संपन्न.
![]()
वाई तालुक्याच्या पूर्व भागातील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचा 71 वा वर्धापन दिन साजरा.
वाई / प्रतिनिधी :
गावगाडा चालविणारी ग्रामपंचायत म्हणजे गावचे विकास मंदिरच. स्वातंत्र्योत्तर काळात सन 1952 मध्ये वाई तालुक्याच्या पूर्व भागातील देगाव येथे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायतीची स्थापना झाली आणि आजवरच्या सर्वच गाव कारभाऱ्यांनी ग्रामस्थ व प्रशासनाच्या मदतीने गावचा नावलौकिक वाढवला आहे.
देगावचा सर्वांगीण विकास साधतानाच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावे दिला जाणारा ग्रामपंचायत सक्षशक्तीकरणाचा तब्बल दहा लाखाचा पुरस्कार घेणाऱ्या देगाव ग्रामपंचायतीने नुकताच आपला 71 वा वर्धापन दिन साजरा केला असून सात दशकांच्या या विकासाभिमुख परंपरेबद्दल ग्रामस्थांसह संपूर्ण तालुक्यातून अभिमान व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत, चावडी, शाळा, तालीम, दवाखाना व मंदिरे ही ठिकाणे म्हणजे प्रत्येक गावचा अभिमानाचा मानबिंदूच असतात. या प्रत्येक घटकांच्या योगदानातून गाव नावारूपास येत असते. त्यातही गावच्या प्रगतीमध्ये पंचायतीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. अगदी त्यानुसारच देगाव ग्रामपंचायतीनेही स्थापनेपासूनच ही विकासाभिमुख परंपरा अखंडपणे जपली आहे.
अर्थात गावातील सर्वच सार्वजनिक मंडळे, संस्था, संघटना, अबालवृद्ध, ग्रामस्थ, मुंबईकर मंडळी व अनिवासी गावकऱ्यांच्या साथीने गावचा नावलौकिक वाढल्यामुळे विविध क्षेत्रात देगावचे नाव आदराने घेतले जाते.
या पार्श्वभूमीवर सात दशकांची विकासमय परंपरा असलेल्या देगाव ग्रामपंचायतीने नुकताच 5 ऑक्टोबर 2023 रोजी आपला 51 वा वर्धापन दिन साजरा करून विविध नागरी सुविधांद्वारे गावच्या होत असलेल्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेतला.
विद्यमान सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायतीच्या वर्धापन दिनानिमित्त आजवरच्या विकासाइतकीच आगामी काळातही संपन्न प्रगतीशील मालिका निर्माण करण्याचा संकल्पही गावकऱ्यांनी यावेळी केला आहे. तसेच आजवरचे सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह विविध प्रतिष्ठित मंडळींनी गावासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आवर्जून कृतज्ञता व्यक्त केली.
ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या आशीर्वादाने देगावने केलेली प्रगती निश्चितच अभिमानास्पद असून ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या सर्वच सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी त्यांच्या त्यांच्या काळात राजकारण, समाजकारण केले. त्या शृंखलेतील सरपंच खालील प्रमाणे
कै. पांडुरंग धोंडीबा इथापे (5/10/52/ ते 14/2/57),
कै. रामचंद्र सावळाराम इथापे (15/2/57 ते 15/4/61),
कै. आनंदराव कृष्णराव इथापे (16/4/61 ते 4/3/66),
कै. गेनुबा भिकु मोरे (5/3/66 ते 10/11/66),
कै. किसन तुकाराम इथापे (11/11/70 ते 7/5/84 दरम्यान सलग 14 वर्षे),
श्री. गणपत सिताराम इथापे (8/5/84 ते 7/9/89),
कै. प्रकाश बंडोबा इथापे (7/9/89 ते 28/10/94) व
पुढे दि. 23/8/95 पर्यंत प्रशासक त्यानंतर
श्रीमती कल्पना प्रकाश पंडित (23/8/95 ते 23/8/2000),
श्री. सर्जेराव महादेव इथापे (दि. 23/8/2000 ते 24/8/2005),
सौ. नंदा प्रकाश इथापे (24/8/2005 ते 23/8/2010),
श्री. अशोक वामन जाधव (23/8/2010 ते 23/8/2015),
सौ. मनिषा विलास इथापे (23/8/2015 ते 23/8/2020 पुढे 8/2/21)
श्री. रुपेश मोरे (प्रशासक /
विस्तार अधिकारी, वाई पंचायत समिती)
श्री. सुरज तानाजी पिसाळ
8/2/21 पासून कार्यरत
या सरपंचांच्या समृद्ध परंपरेचा ग्रामस्थांनी वर्धापन दिन कार्यक्रमात आवर्जून उल्लेख केला.
तर उपसरपंच म्हणून काम पाहिलेल्या
कै. शंकरराव बाबुराव भिलारे,
कै. आनंदराव कृष्णराव इथापे,
कै. किसन तुकाराम इथापे,
कै. सुभेदार श्रीपती इथापे,
कै. महादेव कोंडीबा इथापे,
कै. बापु आनंदा इथापे,
कै. दिलीप सदाशिव इथापे,
कै. चिमणराव कृष्णाजी इथापे,
श्री. हरिचंद्र बाबुराव यादव,
श्री. आनंदराव मारूती इथापे,
श्री. संपतराव यादवराव इथापे,
श्री. योगेश श्रीरंग इथापे,
श्री. बापुराव जगन्नाथ इथापे,
श्री. संजय हणमंत इथापे,
श्री. सचिन शिवाजी इथापे,
श्री. प्रकाश शिवाजी इथापे
या सर्वांनी केलेल्या कार्याचाही कृतज्ञतापूर्वक आढावा घेण्यात आला. वाई तालुक्यातील या सुखी समाधानी आणि समृद्ध गावच्या ग्रामपंचायतिच्या सात दशकांच्या प्रगतिशील वाटचालीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून समाधान व्यक्त करण्यात येत असून अनेकांनी वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायत प्रशासनाला व ग्रामस्थांना शुभेच्छा देत आपला आनंद व्यक्त केला.













