Mon, Mar 2, 2026
अध्यात्म स्थानिक बातम्या

खडकी येथे श्रावण महिन्यांनिमित आयोजित तुकाराम महाराज सामुदायिक गाथा पारायण सोहळ्याचा शुभारंभ

खडकी येथे श्रावण महिन्यांनिमित आयोजित तुकाराम महाराज सामुदायिक गाथा पारायण सोहळ्याचा शुभारंभ
Ashok Ithape
  • PublishedAugust 31, 2023

भुईज दि. ३१ ऑगस्ट :

आध्यात्म्या आणि विज्ञान एकत्र आल्यास जगावर विजय मिळवण्याचे सामर्थ्य मिळू शकते हे नुकतेच चांद्रयान मोहिमेतून आपण सर्वांनी अनुभवले आहे. संत आणि महंत यांची विचारधारा जपणारे आपले संस्कार हेच आध्यात्म्याच्या शिकवणीतून नव्या पिढीला घडवूया असे प्रतिपादन तिरंगा इजुकेशन सोसायटीचे मार्गदर्शक सचिव पै. जयवंत पवार यांनी या वेळी केले.

खडकी तालुका वाई येथे श्रावण महिन्यांनिमित आयोजित तुकाराम महाराज सामुदायिक गाथा पारायण सोहळ्याचे शुभारंभ प्रसंगी पै. जयवंत पवार बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ट पत्रकार व भुईज प्रेसचे संस्थापक जयवंत पिसाळ होते..

यावेळी बोलताना पै. जयवंत पवार पुढे म्हणाले की, गावचे गावपण आणि मानुसपण टिकवण्याचे ताकद फक्त संतांच्या विचारधारेत असून तो एकत्र आल्यास खऱ्या अर्थाने उत्सव सोहळे होतात. हेच सामुदायिक परायनातून जपले जाते. याचा खडकी गावाने केलेला जागर म्हणजेच आध्यात्म होय असे सांगून त्यांनी चांद्रयान मोहिम यशस्वी करणाऱ्या संशोधकाचे उदाहरण देत आध्यात्म्या आणि विज्ञान एकत्र आल्यास जगावर विजय मिळवण्याचे सामर्थ्य मिळू शकते हे नुकतेच चांद्रयान मोहिमेतून आपण सर्वांनी अनुभवले आहे. संत आणि महंत यांची विचारधारा जपणारे आपले संस्कार हेच आध्यात्म्याच्या शिकवणीतून नव्या पिढीला घडवूया असे सांगितले.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत खडकी ग्रामस्थाच्या वतीने ह.भ.प.अरविंदबुवा शिंगटे यांनी केले. यावेळी दादासाहेब शिंगटे पाटील, संभाजीराव शिंगटे, नंदकुमार शिंगटे, आदींनी सत्कार केले..

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!