महावितरणविरोधात तक्रार घेऊन जाधव पोहचले आयोगाकडे
Marathwada Political News : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दोन दिवसांपुर्वी महावितरण कंपनीला सक्तीची वसुली केल्यास वीज नियामक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता. (Harshvardhan Jadhav News) त्यानूसार जाधव आज मुंबई येथील वीज नियामक आयोगाच्या मुख्य कार्यालयात गेले होते. त्यांनी महावितरणकडून नागरीकांना गुणवत्तापूर्वक विद्युत पुरवठा केला जात नाही.
आयोगाच्या नियमानूसार विद्युत कंपनीने कुठल्याही ग्राहकाच्या मीटरला वीज पुरवठ्याची गुणवत्ता तपासणारे यंत्र बसवलेले नाही. (Harshvardhan Jadhav) असे असताना वीजबिल थकले म्हणून महावितरण सर्रासपणे सर्वसामान्य नागरीक व शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करत असल्याचा आरोप केला होता. (Kannad) वीज नियामक कायद्यानूसार अशा प्रकारे वीजपुरवठा खंडित करता येत नाही, अन्यथा महावितरणचे लायसन्स रद्द होऊ शकते, असा इशारा दोन दिवसांपूर्वी दिला होता.
त्यानंतर देखील कन्नड-सोयगाव मतदारसंघात महावितरणकडून कारवाई सुरूच आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांनी आज थेट मुंबईत वीज नियामक आयोगाकडे महावितरणची तक्रार केली आहे. (Marathwada) या संदर्भाती माहिती जाधव यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. नियामक आयोगाच्या आदेश आणि कायद्यानूसार तुम्हाला वीज कट करता येणार नाही. तुम्ही लोकांची वीज कट करण्याचा अट्टाहास कराल, तर मी तुमच्या वीज वितरणाचे लायसन्स रद्द करण्याचा अट्टाहास करील, असा इशारा जाधव यांनी महावितरणला दिला होता.
महाराष्ट्र वीज नियमाक आयोगाच्या कायदा व त्या अंतर्गत कलमाचा उल्लेख करत त्यांनी वीज कंपनीचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला. नियामक आयोगाच्या निर्देशानूसार गुणवत्तापुर्ण वीज पुरवठा आणि त्याचे मोजमाप करणारे यंत्र महावितरणने बसवणे बंधनकारक आहे. असे असतांना राज्यात कुठेही असे यंत्र बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे लोकांना पुरवण्यात येणारी वीज ही गुणवत्तापूर्ण आहे की नाही ? हे तपासणारी यंत्रणाच महावितरणकडे नाही. मग असे असतांना वीजबिल थकले म्हणून लोकांचा विद्युत पुरवठा कोणत्या नियमाने कट करता? असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला होता.





















