मुख्यमंत्री पंचायत अभियानात परखंदी गावाचा ऐतिहासिक विजय ; वाई तालुक्यात प्रथम क्रमांक!
![]()
लोकसहभाग, स्वच्छता, विकासकामे आणि पारदर्शक प्रशासनाच्या बळावर परखंदी गावाला ₹२५ लाखांचे बक्षीस ; ग्रामस्थांचा अभिमान वाढवणारे यश
वाई, प्रतिनिधी : वाई तालुक्यातील परखंदी गावाने मुख्यमंत्री पंचायत अभियानामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गावातील लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन, स्वच्छता, विकासकामे आणि ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांच्या जोरावर परखंदी गावाने विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
या उल्लेखनीय यशामुळे परखंदी गावाला तब्बल ₹२५ लाखांचे बक्षीस जाहीर झाले असून संपूर्ण गावासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. ग्रामपंचायत, पदाधिकारी, कर्मचारी, युवक आणि ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांचे हे फळ मानले जात आहे.
भवानी माता व काळभैरवनाथ साहेबांच्या कृपेने परखंदी गाव आज विकास, एकता आणि लोकसहभागाचे प्रेरणादायी मॉडेल बनले आहे. गावातील विविध विकासकामांमुळे आणि स्वच्छतेच्या उपक्रमांमुळे परखंदी गावाची ओळख संपूर्ण वाई तालुक्यात निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री पंचायत अभियानातील या यशामुळे परखंदी गाव आता वाई तालुका आणि सातारा जिल्ह्याच्या विकास नकाशावर अभिमानाने झळकत आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.





















