भुईंजच्या यात्रोत्सवा निमित्ताने महिलांसाठी आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम महिलांना स्फूर्तिदायक ; आमदार मकरंद पाटील
भुईंज : सांस्कृतिक ओळख असलेल्या भुईंजच्या यात्रोत्सव निमित्ताने महिलांसाठी आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम महिलांना स्फूर्तिदायक असून त्या माध्यमातून नारी शक्तीचा जागर होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे असे प्रतिपादन वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेचे आमदार मकरंद पाटील यांनी केले.
भुईंज येथे नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मी ग्रुप तर्फे आयोजित केलेल्या मंगळागौर कार्यक्रमाच्या बक्षीस समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, प्रकाश धुरगुडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शशिकांत पवार, उपसरपंच शुभम पवार, सदस्य अमित लोखंडे, सुनिल शेवते, गजानन भोसले आदी उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले.
देशाच्या लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी संख्या महिलांची आहे. त्यांनी त्यांच्या संरक्षणासाठी, प्रगतीसाठी कटिबद्ध असले पाहिजे. घटनेने त्यांना दिलेले अधिकार आणि हक्क बजावले पाहिजेत. एकमेकींना पाठिंबा देत, एकत्रित प्रयत्नाने समाजात पुढे आले पाहिजे. नवरात्र महोत्सवात शक्तीचे, देवीचे पूजन करणाऱ्या पुरुषांनी आधी घराघरातील शक्तीरूपे समजून घेतली पाहिजेत. घरातील स्त्रीचे हक्क, अधिकारांची जाणीव ठेवली पाहिजे. बदलांची सुरवात घरापासून केली पाहिजे. स्त्रीचे शांत राहणे, म्हणजे तिचा दुबळेपणा नाही. स्त्री कोमल असेल पण ती कधीच कमजोर नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे’. ‘महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने सुरु झालेल्या या महिला महोत्सवात नारी शक्तीचा गजर होतो आहे. दरवर्षी हजारो महिला या महोत्सवात सहभागी होतात. महिलांसाठी अनेक स्पर्धा घेतल्या जातात. उत्तम टीमवर्कमुळेच हा उपक्रम इतकी वर्षे सातत्याने शक्य होत आहे’.
प्रारंभी गणेशवंदना सादर करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन तसेच देवीची आरती करण्यात आली. मयुरी पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सौ दीपाली भोसले, सौ रुपाली खरे, सौ विमल जाधव, सौ पूजा जांभळे, सौ शैला पिसाळ, सौ सीमा सावंत,
सौ. विद्या संतोष जाधव, सौ. निता भोसले, सौ. संध्या भोसले
सौ. सविता गाडे, सौ. सुवर्णा दगडे, सौ. रश्मी भिंताडे, सौ. तेजल दिक्षीत,vश्रीमती स्नेहप्रभा नलवडे, सौ. विद्या भोसले, सौ. किर्ती सुर्यवंशी आदी उपस्थित होत्या.
आयोजकांचे आभार भुईंजसह वाई खंडाळा महाबळेश्वर या तालुक्यातील महीलांना एकत्रित करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी खूप परीश्रम घेणारे भुईंज गावचे उपसरपंच शुभम पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत ; आमदार मकरंद पाटील.





















