राजधानी सातारा शहरात अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टच्या श्री स्वामी समर्थ पालखी-पादुका परिक्रमा यात्रेचा आगमन सोहळा भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा.
भुईंज l महेंद्रआबा जाधवराव :
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टच्या श्री स्वामी समर्थ पालखीचे शाहूनगरी राजधानी सातारा शहरात काल दुपारी (१६ फेब्रुवारी) भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात आगमन झाले.

श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ, सातारा यांचेवतीने समर्थ पालखी-पादुका यात्रा परिक्रमा यात्रेचे आयोजन अदालतवाड्या जवळील ११६, यादोगोपाळ पेठ, गोविंदनगरी अपार्टमेंट येथे करण्यात आले होते.
स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ नामाच्या जयघोषात गावठाण व मोठ्या उत्साहात पालखी व पादुकांचे आगमन झाल्यानंतर स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दु. १२ वा. आरती झाली. दु. १२.३० ते ४.०० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले होते. दु. २.०० ते ३.०० वा. श्री स्वामी समर्थ पोथींचे पारायण तसेच दु. ३.०० ते ३.३० वा. ११ माळी श्री स्वामी समर्थ जप करण्यात आला. सायं. ६.३० ते ८.३० वा. सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम तर हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत रात्री ७.३० वा. महाआरती नंतर भक्ती व भावगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी पहाटे पाद्यपूजा महा अभिषेक झाल्यानंतर पालखी साता-यातील देशमुख काॅलनीकडे मार्गस्थ झाली.

या पालखी सोहळ्यासाठी शहर व परिसरातील स्वामी भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महिला लहान मुलांसह ज्येष्ठांनी या सोहळ्यात सहभाग घेतल्याने यात्रेचे स्वरूप आले होते. तर संपूर्ण परिसर स्वामी समर्थांच्या जयघोषात दुमदुमला होता. हा पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळाचे सर्व सेवेकरी, स्वामी भक्त भालचंद्र उर्फ तात्या भणगे, महेश व संदीप भणगे, प्रशांत बल्लाळ, सागर माने, सेवेकरी कुर्लेकर, श्रीकांत भोसले, सुरेश जगताप, तसेच सातारा शहर व परिसरातील स्वामी भक्तांनी परिश्रम घेतले.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी व पादुकांचे दर्शन आणि संपूर्ण महाराष्ट्राचे स्वामी यावेत यासाठी स्वामींचे स्थान असलेल्या श्री अक्कलकोटमागे परिक्रमा करीत आहेत. पालखीचे २७ वे वर्ष असून सुमारे १८३ दिवसांमध्ये महाराष्ट्र कर्नाटक, गोवा राज्यातून १० हजार किलोमीटरचा प्रवास करत आहेत. श्री स्वामी समर्थ पालखी आज रात्री लिंब ता.जि. सातारा येथे विसावणार आहे.













