शुभकार्य कोणतेही असो राजधानी सातारा शहरातील योगेश स्वीट्सच्या मिठाई शिवाय ते परिपूर्ण होतच नाही
![]()
शुभकार्य कोणतेही असो लहान अथवा मोठे राजधानी सातारा शहरातील योगेश स्वीट्सच्या मिठाई शिवाय ते परिपूर्ण होतच नाही.असे मत प्रसिद्ध वक्ते व इतिहासाचे अभ्यासक नितीन बानुगडे – पाटील यांनी व्यक्त केले.
भुईंज। महेंद्रआबा जाधव :
सातारी कंदी पेढ्याच्या गोडव्याला महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर जागतिक पातळीवर एक आगळे वेगळे महत्व आहे.पूर्वी साताऱ्याच्या दऱ्या खोऱ्यातून गावागावातुन येणारा खवा आणि त्यापासून तयार केला जाणाऱ्या सातारी कंदी पेढ्याची चव आजही योगेश स्वीट्स मोदी पेढेवाले यांचा कंदी पेढा चाखल्या नंतर जिभेवर रेंगाळते.
ज्या ज्या वेळी मी साताऱ्याला येतो तेव्हा श्रोत्यांचे प्रेम आणि कंदी पेढ्याचा गोडवा सोबत घेऊनच मार्गस्थ होतो असेही बानगुडे- पाटील यांनी यावेळी बोलताना सांगीतले.
नितीन बानगुडे- पाटील यांनी आज प्रसिद्ध कवी व गीतकार प्रवीण दवणे यांच्यासमवेत योगेश स्वीट्स मोदी पेढेवाले येथे सदिच्छा भेट दिली.
योगेश स्वीट्स मोदी पेढेवाले यांनी पिढीजात व्यवसाय सांभाळत असताना नव्या पिढीच्या आवडी निवडी समजून घेत त्यांच्यासाठी देखील विविध मिठाई उपलब्ध केल्या. त्यामुळे जुन्या नव्या लोकांच्या गाठीभेटी इथे होतात.
प्रवीण दवणे यांनी आहाहा कंदी पेढ्या बरोबरच हापूस आंबा बर्फी मधुरच असल्याचे म्हणत योगेशशेठ मोदी यांचे कौतुक केले.
यावेळी साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, ऍड.चंद्रकांत बेबले, पत्रकार विशालराज पाटील, सिद्धार्थ लाटकर, महेश शिंदे, भरत राजपुरोहित, मनोहरसिंग काबावत, अभिजित गार्डे, यश बेबले, राज बेबले, जंगम स्वामी, जावेद शेख, अरविंद पाल उपस्थित होते.













