Thu, Jun 4, 2026
शिक्षण

जवाहर नवोदय विद्यालयातील अकारावीच्या प्रवेशासाठी 31 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जवाहर नवोदय विद्यालयातील अकारावीच्या प्रवेशासाठी 31 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Ashok Ithape
  • PublishedOctober 10, 2023

सातारा दि. 10 :  जवाहर नवोदय विद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियोच्या निवड परीक्षेसाठी https://cbseitms.nic.in/2023/nvsix किंवा https://navodaya.gov.in/nvs/en/Home 1 या संकेतस्थळावर 31 ऑक्टोंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्या ॲन्सी ए.जे. यांनी केले आहे.

विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2007 पूर्वी व 31 जुलै 2009 नंतर झालेला नसावा. ही अट सर्वांसाठी असून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवरांना लागू राहणार आहे. निवड परीक्षा शनिवार दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता घेण्यात येणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!