Thu, Jun 4, 2026
आरोग्य क्राईम न्यूज

औषध विक्रेत्यांनी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनाकरक

औषध विक्रेत्यांनी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनाकरक
Ashok Ithape
  • PublishedOctober 10, 2023

सातारा दि.10 (जिमाका):

गुंगी कारक औषधांच्या अवैद्य विक्रीवर लक्ष ठेण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील किरकोळ औषधे परवाना धारकांनी त्यांच्या दुकानात एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे, असे अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त म.स. जवंजाळ-पाटील यांनी कळविले आहे.

                सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज आवश्यकते प्रमाणे औषध निरीक्षक, बालकल्याण पोलीस अधिकारी आणि शासनाने अथवा जिल्हादंडाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना पडताळणीसाठी उपलब्ध करुन देणेही बंधनकारक असल्याचे म.स. जवंजाळ-पाटील यांनी कळविले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!