Wed, Jun 3, 2026
सरपंचनामा सातारा जिल्हा

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवणुकांचा कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवणुकांचा कार्यक्रम जाहीर
Ashok Ithape
  • PublishedOctober 10, 2023

सातारा दि.10 (जिमाका):

जानेवारी 2023 ते माहे डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीद्वारे तसेच रिक्त जागांच्या पोट निवडणुकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांनी दिली आहे.

या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक 16 ते 20 ऑक्टोंबर सकाळी 11 ते दुपारी 3. नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक   23 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजल्या पासून. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोंबर दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 25 ऑक्टोंबर दुपारी 3 वाजल्या नंतर. मतदानाचा दिनांक 5 नोव्हेंबर सकाळी 7.30 ते सायं.5.30 वाजेपर्यंत, मतमोजणी व निकाल घोषीत करण्याचा दिनांक 6 नाव्हेंबर 2023 व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक 9 नाव्हेंबर पर्यंत राहील.

जानेवारी 2023 ते माहे डिसेंबर 2023 या कालावधी मुदत संपणाऱ्या तसेच मागील निवडणुकीत एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त न झालेल्या व विघटीत झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा तपशील पुढीलप्रमाणे. सातारा तालुक्यातील 5, कराड तालुक्यातील 16, पाटण तालुक्यातील 26, कोरेगाव तालुक्यातील 13, वाई तालुक्यातील 16, महाबळेश्वर तालुक्यातील 17, जावली तालुक्यातील 24, फलटण तालुक्यातील 4, माण तालुक्यातील 4 व खटाव तालुक्यातील 8 अशा एकूण 133 ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

सातारा तालुक्यातील 27, कराड तालुक्यातील 9, पाटण तालुक्यातील 25, कोरेगाव तालुक्यातील 10, वाई तालुक्यातील 9, खंडाळा तालुक्यातील 5, महाबळेश्वर तालुक्यातील 30, जावली तालुक्यातील 33, फलटण तालुक्यातील 9, माण तालुक्यातील 3 व खटाव तालुक्यातील 12 अशा एकूण 172 ग्रामपंचायतींच्या 249 जागांसाठी पोट निवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!