वाई बसस्थानकातील पोलीस चौकी मुळे प्रवाशांना शिस्त, अपघात घडू नये म्हणून विशेष खबरदारी
वाई / प्रतिनिधी –
वाई बसस्थानकावर कायमच प्रवाशांची गर्दी पहावयास मिळते विशेषतः पुणे व सातारा येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते काही दिवसांपूर्वी येथे नवीन पोलीस चौकी पोलीस दलातील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून प्रवाशांच्या सुरक्षत्तेसाठी व सोयी साठी उभारण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चौकी अंमलदार म्हणून पो हवा एल व्ही दगडे पोलीस मित्र सुनील इंगवले मारुती कोंडे व त्यांचे सर्व सहकारी यांची नेमणूक करून प्रवाशांना शिस्तीचे धडे देण्यात येत आहेत.
वाई बसस्थानकात नव्याने उभारलेल्या पोलीस चौकी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रवाशांच्या मिळत असलेल्या सहकार्यामुळे वृद्ध पुरुष महिला व विध्यार्थी- विद्यार्थिनींना बसण्यासाठी जागा मिळत असून सुरक्षित वातावरण बस स्थानाकात पहायला मिळत आहे.
C. C. T. V कॅमेरे बसविणेबाबतही प्रयत्न सुरू असून सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था मंडळे यांचे सहकार्य घेऊन कॅमेरे बसवले जाणार आहेत.
कोणताही अपघात घडू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात असून प्रवाशांनी रांगेत जावे व चोरी होऊ नये म्हणून वारंवार स्पीकर वरून सूचना देण्यात येतात पोलीस प्रशासनासाचे पेट्रोलिंग होत असून विध्यार्थीनी महिला शाळकरी मुली यांचे निर्भयते साठी निर्भया पथक विद्यार्थी पालक संवाद कौशल्य मेळावे किसनवीर कॉलेज ते बस स्थानक पेट्रोलिंग इत्यादि उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.
तसेच संशयित विनाकारण फिरणारे कॉलेज व्यतिरिक्त बाहेरच्या युवकांकडून होणारी फिल्मी स्टाईल भांडणे अशा तरुणांच्यावर प्रति्बंधक कारवाई केली जात आहे त्यामुळे दोन गटात होणारी भांडणे कमी झाली आहेत तसेच स्क्रिनबोर्ड व येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या विषयी अपडेट देण्यात येणार आहे.





















