‘किसन वीर’ला वाचविण्याचे खरे श्रेय शेतकरी व कामगारांना ; नामदार मकरंदआबा पाटील
![]()
बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ संपन्न
भुईंज l दि.२६ : किसन वीर व खंडाळा हे दोन्ही साखर कारखाने सर्वांच्या आग्रहास्तव ताब्यात घेतले. कारखान्यावर प्रचंड कर्जाचा डोंगर असताना तसेच कोणत्याही बँकेचे कर्ज मिळत नसतानादेखील, कारखाने वेळेवर सुरू करू शकलो ते केवळ सभासद शेतकऱ्यांच्या मदतीमुळेच तसेच मागील चार गळित हंगाम यशस्वीपणे पार पाडले व दरवर्षीं कमी दिवसात गाळप क्षमतेपेक्षा जास्त क्रशींग करू शकलो, याचे सर्व श्रेय कामगारांना जात असल्याचे गौरवोदगार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील यांनी काढले.
कारखान्याचा सन २०२६-२७ च्या गळित हंगामाचा व डिस्टीलरी बॉयलरचा अग्निप्रदिपन समारंभ नामदार मकरंदआबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, दत्तानाना ढमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
नामदार पाटील पुढे म्हणाले की, स्व. अजितदादा पवार यांनी किसन वीर व खंडाळा कारखान्यास ४६७ कोटी रूपयांची मदत एनसीडीसी बँकेमार्फत केलेली होती. परंतु आपण सभासदांनी भाग भांडवलापोटी दिलेले पैसे होते त्याच पैशांनी आपण कारखाना सुरू केलेला होता. एनसीडीसी बँकेने जो कर्जपुरवठा केलेला आहे, त्याचा विनियोग बँकेच्या कर्जासाठीच केलेला आहे. याबाबत काही विघ्नसंतोषी मंडळी याबाबतीत अपप्रचार करीत आहेत. मी त्यांना उघडपणे आव्हान करतो की, आपणाकडे कोणताही पुरावा असल्यास सादर करावा, मी व माझे संचालक मंडळ येणारी निवडणुक लढविणार नाही. कृपया आर्थिक चक्रात अडकलेल्या संस्थेला मी व माझे व्यवस्थापन बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असुन यामध्ये काणत्याही प्रकारची आडकाठी आणण्याचा प्रयत्न करू नये. कारखान्याचे सुज्ञ सभासद याकरिता आपणास कधीही माफ करणार नाहीत, याची जाणीव ठेवावी, एवढेच माझे त्यांना सांगणे आहे. ऊस उत्पादकांची सवे देय्यके आपण देण्यास यशस्वी झालो असून येणाऱ्या कालखंडात कामगारांची देणीही कशाप्रकारे देता येतील याचेही प्रयत्न संचालक मंडळ करीत आहे. कारखान्यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण चालत नाही व करू देणारही नसल्याचे नामदार पाटील यांनी सांगितले. राज्यामध्ये खाजगी कारखानदारीचे पेव फुटलेले असुन आपल्याला सहकार मंदीरे वाचविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपले सहकार मंदीर वाचवायचे असेल तर आपल्या सर्वांची साथ मिळाली, तरच हे शक्य आहे. त्याकरिता सर्व शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यास गाळपासाठी देऊन संचालक मंडळाने किसन वीरसाठी ७ लाख तर खंडाळा कारखान्यासाठी ४ लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ठ ठेवलेले आहे हे पुर्ण करण्याचे आवाहनही नामदार पाटील यांनी यावेळी केले.
व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे म्हणाले की, कारखान्यांची वाढलेली स्पर्धा, कारखाने लवकर सुरू करण्याचा निर्णयामुळे किसन वीर व खंडाळा या दोन्ही कारखान्यांची अंतर्गत कामे पुर्ण झालेली असुन गाळपास सज्ज आहोत. दोन्ही कारखान्यांमध्ये कमी दिवसात जास्त क्रशींग करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. किसन वीरसाठी सहा लाख पन्नास हजार तर खंडाळ्यासाठी पाच हजार मेट्रिक टन गाळपाएवढी यंत्रणा भरण्यात आलेली आहे. त्यामुळे संचालक मंडळाने डोळ्यासमोर ठेवलेले गाळपाचे उदिष्ठ पुर्ण करण्यासाठी सर्वांनी मदत करावी,प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले. संजय कांबळे व सौ. शर्मिला कांबळे यांच्या हस्ते डिस्टीलरी बॉयलरचे पुजन तर रविंद्र धुमाळ व सौ. रोहिणी धुमाळ (सोनके), प्रकाश परामणे व सौ. प्रतिभा परामणे (सोमर्डी), संजय साळुंखे व सौ. राधिका साळुंखे (वनगळ), बाळासाहेब भोसले व सौ वनिता भोसले (बावधन), संतोष शिंदे व सौ. संगिता शिंदे (जांब) या उभयतांच्या हस्ते को-जन बॉयलरचे पुजन करण्यात आले.
कार्यक्रमास कारखान्याचे संचालक शशिकांत पिसाळ, बाबासाहेब कदम, दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, शिवाजीराव साळुंखे, डी.एम. भोसले, महादेव मसकर, किरण साबळे-पाटील, बापूसाहेब शिंदे, आत्माराम सोनावणे, शशिकांत पवार, अंकुश लांडगे, बाळासाहेब फाळके, बाळासाहेब दुधे, संपतराव वाघ, विक्रम पिसाळ, दिलीप मोरे, विलास मोरे, मदन भोसले, नागनाथ मोरे, मनोज भोसले, भगवान चौधरी, जितेंद्र चौधरी, भगवान चौधरी, संपतराव महांगडे, राजेंद्र भोसले, राजेंद्र सोनावणे, कांतीलाल पवार, मधुकर भोसले, विश्वास भिलारे, सुर्यकांत भिलारे, सत्यजित वीर, विश्वजित पिसाळ, ॲड. उदयराव पिसाळ, चरण गायकवाड, प्रमोद वारागडे, संजय साळुंखे, कुमार बाबर, ज्ञानोबा शिंगटे, रविंद्र इथापे, निवास शिंदे, विजयराव इथापे, मनिष भंडारे, प्रा. नितीन कदम, सभासद शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली… सभासदांना मिळणार हक्काची साखर
बॉयलर अन्नि प्रदिपन समारंभाचे निमित्त साधुन चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील यांनी आजच्या सभेमध्ये ज्या सभासदांनी कारखान्यास ऊस घातलेला आहे त्यांना १० किलो तर ज्यांनी ऊस घातलेला नाहीं अशा सभासदांना ५ किलो साखर देण्याचे घोषण केली. या निर्णयाने उपस्थित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यांवरचे समाधान बघण्यासारखे होते. या घोषणेने शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षापासुनही साखरेची प्रतिक्षा संपल्याचे दिसून आले. तसेच नामदार मकरंदआबांनी साखर सुरूवात करण्याची ही सुरूवात असुन शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस कारखान्यास घालुन उद्दिष्ठपुर्ती केल्यास भविष्यात यामध्ये वाढ करण्याचे संकेतही दिलेले आहेत.





















