Sat, Nov 28, 2026
महाराष्ट्र

समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी

समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी
Ashok Ithape
  • PublishedNovember 28, 2026

पुणे दि. २२- : समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पुणे विभागात २९ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय स्तरावर जनसुनावणीचे आयोजन पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर सभागृहात करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन सुनावणी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

सुनावणीचे नियोजन जिल्हानिहाय करण्यात आले असून २९ नोव्हेंबर रोजी सातारा जिल्हा सकाळी १० ते ११ या वेळेत, सांगली सकाळी ११.३० ते १२.३०, सोलापूर दुपारी १ ते २, कोल्हापूर दुपारी ३ ते सायंकाळी ४ आणि पुणे जिल्ह्यासाठी सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत होईल. समितीचे सदस्य हे सुनावणी कामी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

या जनसुनावणीसाठी नागरिकांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्धारित वेळेच्या एक तास आधी समक्ष उपस्थित राहावे.

या जनसुनावणीत हितसंबंधित गट, संस्था यांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी निर्धारित दिवशी व निर्धारित वेळेत उपस्थित राहून आपली मते मांडावीत, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे. ज्या नागरिकांना केवळ ऑनलाईन पद्धतीने मते नोंदवायची आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या www.ucc.maharashtra.gov.in या समान नागरी कायदा पोर्टल⁠ वर ३७ मुद्यांची माहिती देता येईल, असेही कळविण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!