Sat, Sep 5, 2026
कलाकार कट्टा

अभिनयसम्राट अशोक सराफ यांचा नागरी सत्कार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव

अभिनयसम्राट अशोक सराफ यांचा नागरी सत्कार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Ashok Ithape
  • PublishedAugust 20, 2026

नागपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या चित्रपट, नाट्य आणि विनोदी अभिनय क्षेत्रात आपल्या अष्टपैलू प्रतिभेचा ठसा उमटविणारे महाराष्ट्र भूषण व पद्मश्री अशोक सराफ यांच्या वयाच्या ८०व्या वर्षात पदार्पणानिमित्त नागपुरात जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला.

दीर्घकाळ आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अशोक सराफ यांच्या कलाक्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाचा गौरव यावेळी करण्यात आला. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला तसेच मराठी मनोरंजन विश्वातील योगदानाला मानाचा मुजरा म्हणून हा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला.

या सोहळ्यास नागपूरच्या महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी आमदार संदीप जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

अशोक सराफ यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात आपल्या अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, त्यांच्या विनोदी आणि संवेदनशील भूमिकांनी अनेक पिढ्यांच्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ८०व्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने झालेला हा नागरी सत्कार त्यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाला मिळालेली आणखी एक मानाची पावती ठरला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!