बाळूमामांचे मुख्य पुजारी श्री कृष्णात डोणे यांची मालेवाडी गावास भेट
![]()
मालेवाडीत बाळूमामांचे मुख्य पुजारी श्री कृष्णात डोणे यांच्या आगमनाने भक्तीचा पूर
भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा” या उक्तीचा प्रत्यक्ष प्रत्यय आज मालेवाडी ग्रामस्थांना आला. सद्गुरू संत बाळूमामा यांचे मुख्य पुजारी आणि प्रख्यात भाकणूककार आदरणीय श्री कृष्णात डोणे महाराज यांचे आज मालेवाडी येथील श्री मंगेश कोळेकर व श्री विलासराव कोळेकर यांच्या निवासस्थानी मंगलमय आगमन झाले.
त्यांच्या या पवित्र गृह भेटीमुळे आणि परिसरस्पर्शाने संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले असून, परिसरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.आदरणीय कृष्णात डोणे महाराज गावात येणार असल्याची वार्ता समजताच मालेवाडी आणि परिसरातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. महाराजांनी उपस्थित सर्व भाविकांना दर्शन देऊन शुभाशीर्वाद दिले.मान्यवरांची उपस्थितीया सुवर्णक्षणी महाराजांचे स्वागत आणि दर्शन घेण्यासाठी परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने श्री मंगेश कोळेकर, श्री विलासराव कोळेकर, श्री बाबासाहेब कोळेकर, श्री सचिन रास्कर आणि श्री विनायक मोटे या मान्यवरांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व बालकांचा मोठा सहभाग होता.महाराजांच्या या पवित्र भेटीमुळे मालेवाडीमध्ये आज खऱ्या अर्थाने दिवाळी-दसरा साजरा झाल्याची भावना निर्माण झाल्याची भावना उपस्थित भाविकांनी आणि कोळेकर परिवाराने व्यक्त केली.





















