Mon, Mar 2, 2026
महाराष्ट्र

दुर्गम प्रतापगड किल्ल्याची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद

दुर्गम प्रतापगड किल्ल्याची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद
Ashok Ithape
  • PublishedJuly 15, 2025

नवी मुंबई l प्रतिनिधी : महाराष्ट्रात 400 गड किल्ले आहेत. त्यामध्ये दुर्ग, गडकोट, भुईकोट किल्ल्यांचा ऐतिहासिक कालीन व शिवकालीन इतिहासाची साक्ष देऊन जागतिक वारसा म्हणून नोंद करावी लागली. युनोस्कोने 2023-2024 मध्ये अभ्यास करून अनेक किचकट मापन प्रक्रियेतून शिवकालीन 12 किल्ल्यांना जागतिक वारसा केंद्र म्हणून नोंद करण्यात आली. महाराष्ट्राची नव्हे तर देशाची अत्यंत अभिमानकारक गोष्ट होऊन 12 गडकिल्ल्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी जागतिक पटलावर नेऊन ठेवला आहे.

महाराष्ट्रमध्ये शिवकालीन पूर्व हिंदूराजे व मराठ्यांनी गड निर्मिती केली होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला व्यापक स्वरूप दिले. छत्रपतींची दूरदृष्टीकोन आज 375 वर्षाच्या इतिहासाच्या कामगिरीची जागतिक लेव्हलवर दखल घ्यावी लागली. संपूर्ण भारत भूमीवर मराठे सरदारा आयुष्यभर लढले. प्राण व त्याग करून हिंदूंचे रक्षण केले. त्यांनी साम्राज्याच्या गडीची तटबंदी सुरक्षित करून ठेवली, स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून मराठे लढत राहिले. वीरगती सुद्धा होऊन गेले. श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे आयुष्यभर स्वराज्य रक्षणासाठी लढून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपती उपाधी लावणारे एकमेव राजे जगामध्ये होऊन गेले. सतत संघर्ष, लढाया करून गड किल्ल्यांची निर्मिती स्वराज्याच्या रक्षणासाठी केली. कुशल अभियंता हिरोजी इंदुलकर यांनी भक्कम किल्ले निर्माण केले. त्याची तटबंदी अजून भक्कमपणे उभी आहे. राजानी रयतेसाठी बांधलेले गड किल्ले, पूल दिमाखात उभे आहेत.

या गडकिल्यांची दखल 375 वर्षांनी युनोस्को सारख्या जागतिक संस्थेने ऐतिहासिक नोंद करून, अभिजीत जागतिक वारसा केंद्र म्हणून बारा किल्ल्यांची नोंद झाली. अत्यंत अवघड परिणामी शर्तीतून आज आपल्या छत्रपती शिवाजी राजे यांचे वैभव दिमाखात जगापुढे आणण्यात यश आले. एकाच वेळी विक्रमी बारा वारसा स्थळांची नोंद होणे हे अवघड काम आहे. सातारा जिल्ह्यामध्ये नैसर्गिक फुलांचे नंदनवन कास पठार जागतिक वारसा केंद्र म्हणून नोंद आहे. आता प्रतापगड किल्ल्याची नोंद होऊन सातारा वासियांना आनंददायी गोष्ट झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू 35 मावळे सरदार सातारा जिल्ह्यातील होऊन गेले. त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी प्राण आयुष्य वेचले. नरवीर तानाजी मालुसरे, जीवा महाले, संभाजी कोंढाळकर, सरनोबत हंबीरराव मोहिते, इसाजी कंक, बाजी पासलकर, प्रतापराव गुजर, नेताजी पालकर, हिरोजी इंदुलकर, कान्होजी जेधे, पिलाजी गोळे, कोंडाजी फर्जद, पिलाजी सनस, मानाजी साबळे, धनाजी जाधव, हिरोजी मराठे, कृष्णा भास्कर, हैबत निंबाळकर, कृष्णाजी बर्गे,गणोजी घोरपडे, शंकरजी नारायण हे शूरवीर सातारा राजधानी मधील होऊन गेले.

महाराजांबरोबर पूर्ण आयुष्य स्वराज्य निर्मितीसाठी व्यतित केले. विशाल सह्याद्रीवर अत्यंत दुर्गम प्रतापगड उभा आहे. घनदाट जंगलात व्यापलेला जावली तालुक्यात प्रतापगड मोठ्या दिमाखतीने उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या पराक्रमामुळे आदिलशहा ने विजापूरचा महाकाय सरदार अफजल खानला वाई स्वारीवर धाडले. त्याच्याबरोबर अफाट सैन्य व दारुगोळा प्रचंड होता. विजापूर वरून येताना पंढरपूर व तुळजापूर मंदिरांच्या नासधूस करून मूर्तींच्या विटंबना केली होती. जनतेला त्रास देत होता. राजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांचा कपटीपणाने वध केला होता. वाई येथील अनेक मंदिरे अफजल खानने उध्वस्त केली होती. जेणेकरून शिवाजी महाराज प्रतापगडावरून अफजल खानवर चालून येतील. मुस्लिम राज्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यावर 1296 ते 1707 पर्यंत अधिपत्य होते.

राजे अत्यंत चाणाक्ष असल्याने खान बरोबर माफीनामा धाडला. आपली मला खूप भीती वाटत आहे आपणच माझी भेट घेण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी यावे असा संदेश पाठवून गनिमी कावा केला आणि अफजलखानाचा वध केला.

आज 375 वर्षांनी याच ऐतिहासिक प्रतापगडाचा जागतिक स्तरावर वारसा म्हणून नोंद झाली ही खरोखरच सातारा जिल्ह्याची अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे. भविष्यात अनेक वारसा स्थळांना दर्जा प्राप्त होईल अशी ही भूमी आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन, संगोपन इतिहास भावी तरुण पिढीला व्हावा. शिवकालीन इतिहास समजावा. सर्वांपुढे इतिहास यावा. एक जागतिक ऐतिहासिक पर्यटन केंद्र बनावे. त्यासाठी जगभरातून इतिहास प्रेमी यांची गडावरती पावले पडतील. जागतिक वारसा केंद्र म्हणून छत्रपती श्रीमंत राजे यांचा पराक्रमाचा इतिहास जगासमोर आला. ही प्रत्येक भारतीय नागरिकांची एकाच वेळी बारा गड किल्ले जागतिक वारसा केंद्रात नोंद होऊन जगापुढे इतिहास निर्माण केला.

श्री. तानाजी फणसे : पर्यावरण संरक्षक
आम्ही सातारकर, नवी मुंबई

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!