वाई विधानसभा मतदार संघाची निवडणुकीसाठी तयारी पूर्ण
![]()
टपाली मतदारांना द्रविड हायस्कूल येथील मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन
सातारा दि.14: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या अनुषंगाने 256 वाई विधानसभा मतदार संघामधील आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करुन आपला लोकशाहीचा हक्क बजवावा असे आवाहन सहा. मतदान अधिकारी तथा तहसिलदार महाबळेश्वर श्रीमती तेजस्वीनी पाटील यांनी केलेले आहे.
256 वाई विधानसभा मतदारसंघाच्या तयारीच्या अनुषंगाने महाबळेश्वर तालुक्यातील सर्व भागातील बी एल ओ यांना व्होटर स्लिप, बी एल ओ रजिस्टर, अंतिम मतदार याद्यांचे वाटप करणेत आलेले आहे.
टपाली मतदान (फॉर्म नं 12) अन्वये मागणी केलेले अर्ज पोलींग स्टाफ, पोलीस स्टाफ, होमगार्ड व इतर अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांना टपाली मतपत्रिका व्दारे मतदान सुविधा केंद्रावर मतदान करणेची सुविधा उपलब्ध करुन देणेत येत आहे. फॉर्म नं 12 नुसार टपाली मतदारांना दि. 15 ते 19 नोव्हेंबर 2024 या पाच दिवसात द्रविड हायस्कुल वाई येथे सकाळी 7 ते सायं. 5 पर्यंत मतदान सुविधा केंद्रावर मतदान करणेची सुविधा उपलब्ध करुन देणेत आलेली आहे.













