Tue, Sep 29, 2026
नोकरी मार्गदर्शन

लोकसंवाद-2026: सातारा येथे २९ सप्टेंबर रोजी महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन

लोकसंवाद-2026: सातारा येथे २९ सप्टेंबर रोजी महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedSeptember 16, 2026

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा

सातारा दि.16 :- जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यात भव्य महाकुंभ रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयातील धनाजी बागल यांनी केले आहे.

शासनाच्या विविध योजना गणेशोत्सव कालावधीत थेट नागरिकांसाठी पोहचाव्यात यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शिंदे-देशमुख इन्स्टीट्युट सातारा येथे लोकसंवाद-2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण, इन्स्टीट्युटचे संस्थापक चंद्रशेखर शिंदे, मच्छिद्र निकम यांच्यासह इन्स्टीट्युटमधील विद्यार्थी उपस्थित होते.

श्री. बागल म्हणाले, या महाकुंभ रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील नामांकित उद्योजक, विविध इंडस्ट्री असोसिएशन आणि विविध क्षेत्रांतील कंपन्या मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या माध्यमातून दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय आणि डिप्लोमाधारक तरुण-तरुणींना थेट मुलाखती देऊन रोजगाराच्या व प्रशिक्षणाच्या संधी मिळवता येणार आहेत.

उद्योजक आणि इंडस्ट्री असोसिएशनच्या सहभागामुळे स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार असून, औद्योगिक क्षेत्राची गरज आणि तरुणांचे कौशल्य यांचा योग्य मेळ या मेळाव्याच्या माध्यमातून घातला जाणार आहे. याशिवाय, विविध महाविद्यालयांतील अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या मेळाव्याच्या निमित्ताने कॉर्पोरेट क्षेत्राचा अनुभव आणि भविष्यातील संधींबद्दल मार्गदर्शन मिळणार आहे.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह आणि बायोडाटासह २९ सप्टेंबर रोजी या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहावे. या सुवर्णसंधीचा जिल्ह्यातील सर्व बेरोजगार युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फायदा घ्यावा, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, सातारा किंवा कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. बागल यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!