Tue, Sep 29, 2026
क्रीडा

बोरगावच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलींची कबड्डीत दुहेरी विजयी भरारी!

बोरगावच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलींची कबड्डीत दुहेरी विजयी भरारी!
Ashok Ithape
  • PublishedSeptember 17, 2026

१४ व १७ वर्षांखालील दोन्ही संघ तालुक्यात अव्वल; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

वाई : प्रतिनिधी

वाई तालुक्यातील किसनवीर महाविद्यालय येथे दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, बोरगावच्या १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या दोन्ही संघांनी दमदार सांघिक खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या दुहेरी यशामुळे बोरगावच्या शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

१४ वर्षांखालील मुलींच्या विजयी संघात मनस्वी वाडकर, अक्षरा मोझर, आकांक्षा जाधव, धनश्री वाडकर, माही वरखडे, स्वराली शिर्के, सानिका मालुसरे आणि सिद्धी यादव यांचा समावेश होता.

तर १७ वर्षांखालील मुलींच्या संघानेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. या संघात श्रेया घाडगे, सई वाडकर, सई पोळ, सई घाडगे, रिया शिर्के, अक्षरा भणगे, अंकिता गावडे, ईश्वरी गोळे, सृष्टी कळंबे, दुर्वा जाधव, शुक्रा कुंभार आणि पंकजा राऊत यांचा समावेश होता.

दोन्ही विजयी संघांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक अजित वाडकर सर यांनी मार्गदर्शन केले. खेळाडूंनी केलेला सातत्यपूर्ण सराव, जिद्द, शिस्त आणि सांघिक प्रयत्न यामुळे हे यश मिळाले असल्याचे सांगण्यात आले.

या उल्लेखनीय क्रीडा यशाबद्दल वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नारायणराव वाडकर, उपाध्यक्ष नारायण वाडकर (गुरुजी), सचिव मधुकर वाडकर, माजी अध्यक्ष लक्ष्मणराव वाडकर, संचालक मंडळ, मुख्याध्यापक संतोष वाडकर, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व पालकांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.

तालुकास्तरावर दुहेरी विजेतेपद मिळवल्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल बोरगावच्या दोन्ही मुलींच्या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही दमदार कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!