Tue, Jul 21, 2026
पोलीस डायरी ब्रेकिंग न्यूज

न्यायालयात गोळीबारातील आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडी

न्यायालयात गोळीबारातील आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडी
Ashok Ithape
  • PublishedAugust 8, 2023

वाई येथील न्यायालयात गोळीबार प्रकरणी राजेश चंद्रकांत नवघणे ( वय २६,रा मेणवली) याला पोलिसांनी आज अटक केली.न्यायालयाने त्याला दोन दिवसांची   पोलीस कोठडी दिली आहे.

नवघणे याच्याबरोबर  आणखी काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांने गोळीबारात वापरलेले पिस्टल कोणाकडून घेतले याबाबत त्यांची कसून चौकशी सुरु असल्याची माहिती  पोलिसांनी दिली.

सोमवारी रात्री पोलीस महानिरीक्षक  सुनील कुमार फुलारी यांनी वाई पोलीस ठाण्यास भेट देऊन  तपासा बाबत  अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे  अरुण देवकर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक सुधीर वाळुंज कृष्णकांत पवार हे तपास कामी पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत.

अधिक तपास परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना करत आहेत. लवकरच ठोस निष्कर्षा प्रत आम्ही पोहोचत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले*

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!