खाणपट्टा/तात्पुरते परवाने मंजूर केलेल्या ठिकाणी अथवा अन्य जागेत विनापरवाना उत्खनन झालेल्या सर्व क्षेत्राचे सद्यस्थितीचे व मागील तीन वर्षाच्या Google Image चा वापर करुन दंडात्मक कारवाई करणेबाबत.
सातारा दि.4: आपल्या अधिनस्त ज्या क्षेत्रावर खाणपट्टा अथवा तात्पुरते परवाने मंजूर करण्यात आले आहेत, अथवा याव्यतिरिक्त अन्य जागेत विनापरवाना गौण खनिज उत्खनन केल्याचे निदर्शनास आलेले आहे किंवा तक्रार प्राप्त झाली आहे. अशा सर्व क्षेत्राचे आवश्यक असल्यास MRSAC यांची मदत घेऊन सन २०१७ व २०२२ मधील त्यांचेकडील उपलब्ध High Resolution सॅटेलाईट इमेजचा व Google Earth वरील चालू ईमेजचा तौलनीक अभ्यास करून उत्खननासाठी परवानगी दिलेल्या क्षेत्रामध्येच उत्खनन करण्यात आलेले आहे किंवा कसे याबाबतची शहानिशा करावी.
तसेच, उत्खनन झालेल्या क्षेत्राचे ड्रोनद्वारे अथवा ई.टी.एस द्वारे मोजमाप करून आढळून आलेली तफावत आणि गौण खनिज उत्खननास देण्यात आलेले परवाने यांचा ताळमेळ घालून परवानगीपेक्षा जास्त अवैध उत्खनन झाले असल्याचे निर्दशनास आल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ व महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन), नियम २०१३ मधील तरतुदीनुसार संबंधिताविरुध्द १५ दिवसाच्या आत दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश कक्ष अधिकारी, महसूल व वन विभाग सदानंद मोहिते यांनी दिले आहेत













