Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

कलाकार कट्टा

भुईंजच्या सुपुत्राचा राज्यस्तरीय सन्मान!

भुईंजच्या सुपुत्राचा राज्यस्तरीय सन्मान!
Ashok Ithape
  • PublishedMarch 27, 2026

सुजय शेवते यांना ‘आदर्श कलाध्यापक पुरस्कार २०२६’ जाहीर; साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

भुईंज l प्रतिनिधी : वाई तालुक्यातील भुईंज येथील सुपुत्र व सातारा जिल्ह्यातील कन्या शाळेचे कलाशिक्षक श्री. सुजय यशवंत शेवते यांना प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार २०२६’ जाहीर झाल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यासह भुईंज गावाचा अभिमान उंचावला आहे.

महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मान्यतेने ‘महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ’तर्फे हा सन्मान प्रदान केला जातो. कला शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता विकसित करण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक व शैक्षणिक योगदान याची दखल घेत जिल्हा संघाच्या शिफारशीवरून श्री. शेवते यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, हा पुरस्कार वितरण सोहळा दि. २८ व २९ मार्च २०२६ रोजी सातारा येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह (जिल्हा परिषद) येथे आयोजित ४४ व्या कला शिक्षण परिषदेत पार पडणार असून, मान्यवरांच्या हस्ते श्री. सुजय शेवते यांचा गौरव करण्यात येणार आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सहकारी शिक्षक, विद्यार्थी तसेच भुईंज ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे भुईंज गावासह सातारा जिल्ह्याच्या कला क्षेत्रात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!