माँर्निंग-वाँक करणारेंच्या सुरक्षेसाठी भुईंज पोलिस उतरले रस्त्यावर
![]()
एकट्याला पाहून लुटमार करणारें विरोधात भुईंज पोलिस अँक्शन मोडवर
पाचवड (प्रतिनिधी) : भुईंज पोलिस स्टेशन हद्दीतील पहाटे किवा सायंकाळी वाँकसाठी फिरणारया नागरीकांच्या सुरक्षासाठी रस्त्यावरील पोलिस पँट्रोलिंग मध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
भुईंज पोलिसांनी अवाहन केले आहे की मॉर्निंग वॉकला घाईगडबडीत घराबाहेर पडताय, तर जरा सांभाळून जावा. गळ्यात असलेले मंगळसूत्र,हातातील अंगठी, महागडे मोबाइल, रोकड अशा प्रकारच्या काहीही वस्तू घेऊन जाऊ नका, कारण सोनसाखळीसह अन्य दागिने चोरणारे भुरटे चोर एकट्याला पाहून लुटण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत.
सातारा शहरासह, फलटण कराड परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत आहेत. विशेषतः मॉर्निंग वॉकला गेलेले वृद्ध लोक हेरून त्यांच्याकडील दागिने हातोहात लांबविले जात आहेत. आम्ही पोलिस आहोत.पुढे अपघात झाला आहे. बंदोबस्तासाठी आम्ही इथे थांबलोय. एवढे दागिने कशाला घातले आहेत, असे सांगून दागिने हातचलाखी करून चोरून नेले जात आहेत.काहीवर्षापासून ही चोरीची पद्धत सुसुकाट असणारया परीसरात सुरूच आहे.
भुईंज पोलिसांनी असे प्रकार घडू नयेत या कारणास्तव
मॉर्निंग वॉकला जाणारयापैकी अनेक लोकांना भेटून पोलिसांनी सुरक्षासंबंधीत माहीती दिली.आपल्या बाबतीत सोनसाखळी चोरीचे प्रकार घडूच शकत नाही आम्ही चालतो त्या रस्त्यावर वर्दळ असते.अशा अविर्भावात बोलणारया नागरीकांची पोलिसांनी चांगलींच कानउघडणी केली.व सावधानतेने चालण्याच्या सुचना केल्या.
सद्यपरीस्थीत काही लोक चालताना हेडफोन लावून गाणी एैकण्यात मग्न असतात तसेच निर्जन ठिकाणी कोणी नसल्याचे पाहून असे प्रकार घडू शकतात अशा सुचना केल्या, एकटे न जाता सोबत ग्रुपने जाणे हिताचे ठरेल आणि कोणतीही घटना रस्त्यावर संशयास्पद वाटल्यास सुरक्षेसाठी भुईंज पोलिसांकडून पेट्रोलिंग नेमण्यात आली असून खालील क्रमांक ०२१६७२८५२३३ वर संपर्क करण्याची सुचना केली.













