लोकसंत सद्गुरू नारायण महाराज आण्णा यांचे मासिक स्मृती व्याख्यान उद्या भुईंज येथे
अवघ्या मानव जातीला माणसा तू माणसा सारखा वाघ हा संदेश देत देशाच्या चारही बाजूला चार धाम निर्माण करणारे विश्वचैतन्य प,पू श्री सदगुरू नारायण महाराज आण्णा यांच्या स्मृती व जागर करणारे व्याख्यान 9 ऑक्टोबर रोजी सकाळी भुईंज येथील आचार्य भृगुरूषी मठावर होणार असल्याची माहिती संयोजक आचार्य भृगुरूषी मठ सेवेकरी, दत्त सेवेकरी मंडळ, प्रेस क्लब, जेष्ठ नागरिक संघ, पारायण मंडळ व अण्णांच्या लेकी, व भुईंज ग्रामस्थांनी दिली.
संयोजकांनी सांगितले की सद्गुरू आण्णा महाराज यांचे विचार व संदेश यांचा जागर करणारे मासिक स्मृती व्याख्यान प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला होणार असून पहिले व्याख्यान सद्गुरू आण्णा यांचे निकटवर्तीय व संस्थान चे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर यांचे होणार आहे, सकाळी अकरा वाजता सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.













