Thu, Jun 4, 2026
Close

Recent Posts

सातारा जिल्हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन
Ashok Ithape
  • PublishedAugust 18, 2024

सातारा, दि. १८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सातारा येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन केले.  यावेळी त्यांनी नवीन शासकीय विश्रामगृह सर्व सोयी सुविधेसह सज्ज ठेवावे, असे निर्देश दिले.

सातारा येथील नवीन बांधण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार सर्वश्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नवीन विश्रामगृहाच्या इमारतीची पाहणी केली.  ते पुढे म्हणाले सातारा शहरातील सदर बाजार येथील ही एक देखणी वास्तू निर्माण झाली आहे. या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि इमारतीची देखभाल योग्य करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

असे आहे नवीन शासकीय विश्रामगृह
सातारा येथील शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण करण्यात आले असून या ठिकाणी नवीन विश्रामगृह बांधण्यात आले आहे. यासाठी १३ कोटी १२ लाख ७६ हजार १९४ रुपये खर्च आला. यामध्ये मल्टीपर्पज हॉल, साधारण कक्ष-५, डायनिंग व किचन, स्वागत व प्रतिक्षा कक्ष, एव्ही रुम, पैंट्री, स्टोअर रुम, व्हीव्हीआयपी सुट-१ व्हीआयपी सुट २ कॉन्फरन्स रुम व स्टोअर रुमसह आकर्षक विद्युत रचना, प्रोजेक्टर, ऑडियो व्हिडिओ सिस्टीम, अद्यावत फर्निचर, सर्व रुम मध्ये टेलिव्हिजन आदी सुविधा उपलब्ध आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!