Fri, Apr 17, 2026
अध्यात्म

श्री महालक्ष्मी मंदिर भुईंज येथे श्रावणी कुंकुमार्चन विधी सोहळ्याचे आयोजन

श्री महालक्ष्मी मंदिर भुईंज येथे श्रावणी कुंकुमार्चन विधी सोहळ्याचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedAugust 3, 2024

पहिल्या श्रावणी शुक्रवारी दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारी २:३० वाजता सोहळ्याचे आयोजन

भुईंज l महेंद्रआबा जाधवराव

श्री महालक्ष्मी देवस्थान व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भुईंज यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या श्रावणी शुक्रवारी दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारी २:३० वाजता श्री महालक्ष्मी मंदिर भुईंज येथे *श्रावणी कुंकुमार्चन विधी सोहळा* आयोजित केला असून देवीच्या या शक्तित्व सोहळ्यात पंचक्रोतील सर्व महिलांनी सहभागी व्हावे. तसेच येताना सर्वांनी श्री यंत्र, नित्यसेवा दुर्गासप्तशति ग्रंथ,बसायला आसन, कुंकु लाल वस्त्र आणावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सौ.गंगाताई गाडे व सौ. विद्याताई किर्वे यांनी केले आहे.

देवीचे माहत्म्य सांगणाऱ्या स्तोत्रांचे सहस्त्र नामस्मरण करणे, आणि प्रत्येक नामःस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर अथवा तस्वीरीवर चिमूटभर कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. मंत्रोच्चार, पूजा, वाद्यांचे आवाज यामुळे घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते. मनामध्ये प्रसन्नता येते.

कुंकवामध्ये शक्तितत्व आकर्षित करण्याची श्रमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असे मानले जाते. कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकवामध्ये उतरली जाते. ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्तीतत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करण्यात येते.

कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या ग्रंथ लहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तीतत्त्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगूण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतिक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्ती तत्वाच्या बिजाला गंध हाही कुंकुवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम मानले जात असल्याने भुईंज येथील श्री महालक्ष्मी मंदिरात होणाऱ्या या श्रावणी कुंकुमार्चन विधी सोहळ्यात सर्व महिलांनी भगिनी यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री महालक्ष्मी देवस्थान समिती यांचे तर्फे करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!