PSI पदावर भुईंजच्या तेजल भोसलेंची तेजोमय कामगिरी…
![]()
भुईंजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
चिंधवली l दिपक पवार
मनी वसे ते स्वप्नी दिसे.. अगदी असच काहीसं तिनं केलं, राखलं आणि सर्वांना जिंकलं… आणि जिंकली ती भुईंजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवूनच…
भोसले घराण्याला शोभेल अशी स्वच्छंदी वाटचाल जगत आणि तिथेच अजूनही स्वप्नातल्या गोष्टी सत्यात उतरवण्याची आस लागली आणि ती आस आज तिला यशस्वी शिखरापर्यंत पोहचवू शकली,
वेळ, काळ आणि स्वत:मधील कर्तबगारी सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे हे तिने समजून घेतले आणि स्वतःबरोबर आई वडिलांचे नाव मोठे केलेच पण भुईंजचे नाव पुन्हा एकदा महाराष्ट्रात चमकले.

कु. तेजल उदयसिंह भोसले, रा. (भुईंज) चाहूर, ता.वाई, जि.सातारा असून किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना लि. भुईंज येथे कार्यरत असणारे डिस्टीलरी मॅनेजर श्री उदयसिंह भोसले साहेब यांची कन्या असून तिचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण भुईंज येथे व अभियांत्रिकी शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षा मार्ग निवडला…
या यशस्वी वाटचालीत आई वडील, पै पाहुणे आणि भोसले कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्याने हे घवघवीत यश प्राप्त झाले आहे.
सातत्यपूर्ण अभ्यास, तुमचं ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यांसमोर असेल तर कोणतेही यश हमखास मिळते हाच तरुणाईला त्यांनी मोलाचा सल्ला दिला.













