पाचगणी येथे पार पडलेल्या पिंच्याक पाचव्या वेस्ट झोन सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र संघ प्रथम, मध्य प्रदेश द्वितीय व दमन दिव तिसऱ्या क्रमांकावर विजयी
![]()
मॅप्रोचे कं. मयूर होरा, सेंट पिटर स्कूलचे प्रिंसिपल विल्फ्रेनोरहोनाड यांचा हस्ते खेळाडूचा गौरव…
वाई l प्रतिनिधी –
महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशने (MPSA) ५व्या वेस्ट झोन पिंच्याक सिलॅट स्पर्धा २०२४ सर्व वयोगटातील मुलामुलींसाठी सेंट पिटर स्कूल पाचगणी येथे आयोजित केली होती.
आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत महाराष्ट्र संघाने चौथ्यांदा ५ व्या वेस्ट झोन पिंच्याक सिलॅट स्पर्धेचा चॅम्पियनशिप चषक ४३ सुवर्ण, ४९ रजत पदके मिळवून पटकविला तसेच मध्यप्रदेश संघाने २४ सुवर्ण, १० रजत पदके मिळवून व्दितिय चषक मिळवला अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकाचा चषक दिवदमन संघाने ७ सुवर्ण,१ रजत,३ कांस्य पदके मिळवून मिळवला राजस्थान संघ ६ सुवर्ण, ५ रजत, ४ कांस्य, पदके मिळवून ४ थ्या स्थानावर राहिला.
या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मयुर व्होरा मेप्रो फुडचे संस्थापक ,किशोर येवले राष्ट्रीय अध्यक्ष पिंच्याक सिलॅट फेडरेशन ,विल्फ्रेनोरहोनाड मुख्याध्यापक सेंट पिटर स्कुल पाचगणी, व सेंट पिटर स्कूलच्या संध्या पिसाळ, फिलिया थॉमस व अब्रार अहमद शेख उपाध्यक्ष इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन,अँथनी ब्रिंगेजा सचिव पिंच्याक सिलॅट असोसिएशन ऑफ गोवा, झोन पिंच्याक सिलॅट असोसिएशन चे अध्यक्ष ॲलॅक्स थॉमस, अभय श्रीवास्तव सचिव पिंच्याक सिलॅट असोसिएशन ऑफ मध्यप्रदेश, संजिव वरे सचिव स्पर्धा, अरविंद शिर्के स्पर्धा संचालक साहेबराव, नागेश बनसोडे, सुरेखा येवले उतरेश्वर सपाटे सदस्य निसार शेख चंद्रकांत महांगडे सचिन आदमाने या मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला.
स्पर्धेमध्ये यजमान महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दादरा नगर हवेली दमण आणि दिव, मध्यप्रदेश, राजस्थान या विविध राज्यातील ३०० खेळाडू सहभागी झाले होते.
पौर्णिमा तेली, अंशुल कांबले, शिवराज वरे, नागेश काळभोर, जयश्री राठोड, रूपाली वाघ, ओम शिंदे, भरत जाधव, अमोल कदम या पदाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले पिंच्याक सिलॅट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट खेळ प्रकार असून (१) फाईट) (२) (क) (३) रेगु (ग्रुप काता) (४) गंडा (डेमो फाईट) सोलो (क्रिएटिविटी) या पाच प्रकारात खेळला जातो.
१ सप्टेंबर २०२० ला या खेळाचा समावेश भारतीय क्रिडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या ५% राखिव नोकर भरतीमध्ये केला आहे. या खेळाला युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालय भारत सरकार”, “भारतीय विश्वविद्यालय संघ अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड ऑलिम्पिक कांऊमिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट्सगेम एशियन यूथ गेम व एशियन बीच गेम, भारतीय विश्वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये खेळला जातो.
या खेळाचा समावेश गोव्या मध्ये झालेल्या ३७व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये १४ मे २०२३ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला . उपस्थित मान्यवरांनी विजयी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.













