Mon, Mar 2, 2026
साहित्य

शतकोत्तर परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेस वाईमध्ये महाराष्ट्र दिनी प्रारंभ

शतकोत्तर परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेस वाईमध्ये महाराष्ट्र दिनी प्रारंभ
Ashok Ithape
  • PublishedApril 13, 2024

सलग 21 दिवस कृष्णाकाठी रंगणार श्रवणीय ज्ञानसत्र

वाई दि. १२ शतकाची वाटचाल पूर्ण केलेली वाई येथील वसंत व्याख्यानमाला यंदाच्या वर्षी १ मे ते २१ मे या कालावधीत संपन्न होत असून यंदाचे वसंत व्याख्यानमालेचे १०८ वे वर्ष आहे. यंदाच्या वसंत व्याख्यानमालेची सुरुवात प्रख्यात लेखक विश्वास पाटील यांच्या ‘पानिपत ते महासम्राट शिवाजी माझा प्रवास’ या व्याख्यानाने होणार आहे”. अशी माहिती लो. टिळक स्मारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंतनू अभ्यंकर आणि कार्याध्यक्ष डॉ. चिंतामणी केळकर यांनी नुकतीच दिली.

वाई येथील ही वसंत व्याख्यानमाला गेली 100 वर्ष अखंडितपणे सुरू असून या व्याख्यानमालेत अनेक ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ अभिनेते, संगीत तज्ञ, आदी लोकांनी अभ्यासपूर्ण मते मांडले आहेत. वाई येथील गणपती घाटावरील भव्य मैदानात दररोज सायं ६.३० वा. व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते.

यंदाच्या व्याख्यानमालेमध्ये महेंद्र शिंदे, देवदत्त गोखले, प्रफुल्ल वानखडे, सुचिता भिडे चाफेकर, अशोक राणे, घनश्याम पाटील, मकरंद टिल्लू, जगन्नाथ दीक्षित, प्रशांत कुलकर्णी, भूषण केळकर, समीर नेसरीकर, वर्षा काळे, धीरज घाडगे, संदीप खरे, मीना गोटखिंडी, निर्मला गोगटे, मनोज बोरगावकर, स्वाती महाळक, नरसैय्या आडम, वैभव मांगले यांची विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

व्याख्यानमालेत साहित्य, इतिहास, पर्यावरण, तंत्रज्ञान, भाषा, अर्थशास्त्र, महिलांचे प्रश्न, विविध कायदे, तसेच संदीप खरे यांची मी आणि माझी कविता व बीडी कामगारांचे प्रश्न आदी विषयांवर वरील वक्ते आपली अभ्यासपूर्ण मते मांडणार आहेत, महाराष्ट्रामध्ये शतक पूर्ण केलेल्या ठराविक व्याख्यानमालेमध्ये वाई ची व्याख्यानमाला अग्रस्थानी आहे. अशी माहिती व्याख्यानमालेची कार्याध्यक्ष डॉ. चिंतामणी केळकर यांनी दिली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!