छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सव २०२४ निमित्त राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट पुणे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा व स्वराज्यरथ मिरवणुक.
भुईंज। महेंद्रआबा जाधवराव
शिवजयंती २०२४ निमित्त राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट पुणे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा व स्वराज्यरथ मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन लखुजीराव जाधवराव ट्रस्टचे अध्यक्ष अभयसिंह जाधवराव यांनी केले आहे.
माघ शु. १० शके १९४५ सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९.०० वा शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राजे जाधव आणि राजे जाधवराव घराण्यातील पराक्रमी पुरुषांनी स्वराज्यकरीता केलेल्या शौर्याचे व बलिदानाचे स्मरण करण्याचाठी आम्ही राजे जाधव व राजे जाधवराव स्वराज्य रथ साकार करीत आहोत. तरी आपण सहकुटुंब उपस्थित राहून शिवजन्मोत्सव सोहळा व स्वराज्यरथ मिरवणूकीची शोभा वाढवावी असे आवाहनही राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट पुणे यांचेवतीने करण्यात आले आहे.
लाल महाल, (नवग्रह मंदिरा जवळ रथ क्र. ३५) कसबा पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या
कार्यक्रमाची रुपरेषा पुढील प्रमाणे
सकाळी ०९.०० वा. राजमाता जिजाऊ अभिवादन – लाल महाल
सकाळी १०.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नविन मुर्तिचे अनावरण
सकाळी ११.०० वा. ‘सिंदखेडराजा लखुजीराव जाधवराव जीवनगाथा’ लेखक श्री रमेश भीवरे सर यांचा सत्कार
सकाळी ११.३० वा. सर्व बांधवांचा परिचय व मान्यवरांचे मनोगत
दुपारी ०१.०० वा. स्नेहभोजन दुपारी ०२.३० वा. मुख्य मिरवणूक आणि श्री स्वराज्य रथ क्र.३५ मार्गस्थ (लालमहाल एस एस पी एम एस मैदान)
सायं. ०४.०० वा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना (एस एस पी एम एस मैदान)
संपर्क :-
अभयसिंह जाधवराव : ९९२१७१२००६
दुष्यंत जाधव : ९३७१८७८९८७
निलेश जाधव : ९०११०११९४५ समीरसिंह जाधवराव ९८८१००८५७२













