Tue, Mar 3, 2026
अध्यात्म

श्री स्वामी समर्थ पालखी-पादुका यात्रा परिक्रमा यात्रेचे शुक्रवार राजधानी सातारा येथे आगमन.

श्री स्वामी समर्थ पालखी-पादुका यात्रा परिक्रमा यात्रेचे शुक्रवार राजधानी सातारा येथे आगमन.
Ashok Ithape
  • PublishedFebruary 15, 2024

भुईंज महेंद्रआबा जाधव

श्री स्वामी समर्थ पालखी-पादुका यात्रा परिक्रमा यात्रेचे आगमन  शुक्रवार दि. १६/०२/२०२४ रोजी राजधानी सातारा येथे होणार असून भाविक भक्तांनी श्री स्वामी पादुका दर्शनचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ, सातारा यांचेवतीने करण्यात आले आहे.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट ह्या न्यासाचे वतीने अनंतकोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा सबंध महाराष्ट्रातील गावोगांव असलेल्या स्वामी भक्तांना करता यावे यासाठी श्री स्वामींच्या पालखी पादुका परिक्रमेचे आयोजन केले आहे.

तसेच अन्य कारणास्तव दुरवरच्या अबालवृध्द, महिला स्वामी भक्तांना श्रींच्या दर्शनास्तव इच्छा असूनही स्वामींच्या मूळस्थानी अक्कलकोट येथे येता येत नाही अशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामींच त्यांच्या गावी येत आहेत.

राजधानी सातारा येथील ११६, यादोगोपाळ पेठ, गोविंदनगरी अपार्टमेंट येथे होणा-या कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे.
शुक्रवार दि. १६/०२/२०२४
पालखीचे आगमन झाल्यावर  दु. १२.०० वा.आरती.
दु. १२.३० ते ४.०० वा.महाप्रसाद
दु. २.०० ते ३.०० वा. श्री स्वामी समर्थ पोथींचे पारायण
दु. ३.०० ते ३.३० वा. ११ माळी श्री स्वामी समर्थ जप
सायं. ६.३० ते ८.३० वा. भजन
रात्री ७.३० वा. महाआरती होणार आहे.
शनिवार दि. १७/०२/२०२४ रोजी सकाळी ६ वाजता महाअभिषेक केला जाणार असून  नंतर पालखी-पादुका मार्गस्थ होतील.

संपर्क
9890106200 l 9822528809 l 9850092167 9421119012 l 9422600046 l 9822478033 l 9765077562

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!