Fri, Apr 17, 2026
राजकीय बातमीपत्र

महायुतीच्या “महाविजय २०२४ साठी’ महायुतीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेनेला भाजपाकडून मान्यता.

महायुतीच्या “महाविजय २०२४ साठी’ महायुतीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेनेला भाजपाकडून मान्यता.
Ashok Ithape
  • PublishedFebruary 15, 2024

लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीला अधिक बळकट करण्यासाठी ॲड. श्रीहरी बागल राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय स्वराज्य सेनेला महायुतीतील घटक पक्ष म्हणून सहमती देण्यात आली आहे .महायुतीतील घटकपक्ष म्हणून सहभाग नोदविण्यात आला आहे.

ॲड श्रीहरी बागल. राष्ट्रीय अध्यक्ष . राष्ट्रीय स्वराज्य सेना ( मराठा राजकीय पक्ष) रजि. नं .56/284/2018-19/PPS-i New DELHI ) हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील राजकारणात काम करत असून मराठा समाजासह शेतकरी व कष्टकरी या घटकांच्या प्रश्नावर कार्य करत असून महायुतीचा ‘ महाविजय २०२४’ साकार करण्यासाठी सारे एकत्रित काम करून पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब योच्या नेतृत्वा खाली देश विकासाचे नवे उच्चांक गाठत आहे.

यासाठी एकत्र येवून ‘महाविजय २०२४ ‘साठी महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेना ही कामाला लागली आहे
मुख्यमंत्री मा श्री एकनाथ शिंदे साहेब , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस साहेब , मा श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब व मा श्री प्रसाद लाड साहेब आमदार प्रतोद/ समन्वयक पक्ष व राज्य सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात दौरे सुरु करुण कामालाही लागले आहेत प्रत्येक जिल्हा निहाय मेळावे घेण्यास हि सुरुवात करत आहेत.

महायुती सरकारने कोणत्याही समाजावर अन्याय न करता कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले त्याबद्दल महायुती सरकार चे पुनश्च धन्यवाद व आभार व समाजातील काही घटकांना काही कुणबी नोंदी शोधण्यास किंवा दाखले भेटण्यास काही अडचणी असेल तर त्यांनी तेथील जिल्हा अध्यक्ष किंवा मला थेट संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष ॲड श्रीहरी बागल साहेब यांनी केले आहे .

– ॲड. श्रीहरी बागल
राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना (मराठा राजकिय पक्ष) ELACATION COMMISSION OF INDIA REG NO – 56/284/2018-19 /PPS-i (New DELHI)

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!