Tue, Mar 3, 2026
शिक्षण

वाई येथील कन्याशाळेत रंगोत्सव स्पर्धा उत्साहात संपन्न

वाई येथील कन्याशाळेत रंगोत्सव स्पर्धा उत्साहात संपन्न
Ashok Ithape
  • PublishedFebruary 12, 2024

वाई l प्रतिनिधी:

वाई येथील कन्याशाळेत रविवारी इंटरनॅशनल रंगोत्सव स्पर्धा आत्यंतिक उत्साहात संपन्न झाल्या. रंगोत्सव मध्ये इयत्ता पहिलीपासून ते दहावी पर्यंतच्या विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
रंगभरण,कोलाज,स्केचिंग,फोटोग्राफी, टॅटू मेकिंग,हस्ताक्षर, ठसेकाम अशा विविधांगी, वैविध्यपूर्ण स्पर्धांना विद्यार्थी सहभाग भरपूर मिळाला.

अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण होण्यासाठी मदत होते,असे प्रतिपादन मुख्याध्यापिका रुक्मिणी भोये यांनी केले.
या वेळी केंद्र संचालिका व शाळेतील कला शिक्षिका प्रीती बागुल
यांनी स्पर्धा आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

त्यांना गजानन पाडळे,जयश्री कुंभार,यांनी सहकार्य केले,
रंगोत्सव स्पर्धा पुढील वर्षीपासून मोठ्या प्रमाणात आयोजित केली जाईल,असा विश्वास आयोजक संग्राम दाते यांनी दिला.
कला,क्रीडा,संगीत हे छंद म्हणून जोपासावेत त्यातून जीवनातील आनंद शोधता येतो,असे आग्रहाचे निवेदन प्रीती बागुल यांनी केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!