Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

खांबील चोरगे गावात यात्रे निमित्त जंगी कुस्त्यांचा फड

खांबील चोरगे गावात यात्रे निमित्त जंगी कुस्त्यांचा फड
Ashok Ithape
  • PublishedJanuary 20, 2024

तापोळा / प्रतिनिधी :

तापोळा विभागातील गावागावात यात्रा उत्सव सुरू आहे. खांबील चोरगे गावातील जननी भवानी यात्रेच्या निमित्ताने जंगी कुस्त्यांचा फड भरविण्यात आला होता.

कुस्ती हा मातीतील खेळ. व्यायामाची आवड लागावी, भीड कमी व्हावी. मुलांना कसरतीचे कसब यावे आणि कुस्ती शौकीन यांना कुस्त्या पाहता याव्या यासाठी कुस्ती फड आयोजित केले जातात.

खांबील गावात अनेक कुस्ती पैलवान खेळ दाखवण्यासाठी आले होते.या कुस्ती फडात तापोळा, कुरोशी, आपटी, वाकी, वेळापूर, गावढोशी, लाखवड, निपाणी, रामेघर, खांबील, याबरोबर मेढा आणि वाई खोऱ्यातील पैलवान हजर होते.

शड्डू ठोकणे,  कुस्ती नंतर वस्तादाचा जयघोष, तालीमीचा उल्लेख, आकर्षक पध्दतीने उड्या मारून साजरा केलेला आनंद प्रेक्षकांना पर्वणी होती.

ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कुस्ती फडात लक्ष्मण कदम, पांडुरंग कदम, बळवंत कदम लक्ष्मण राघू कदम  यांनी पंचाची भूमिका पार पाडली. सोळशी विभागातील हजारो कुस्ती प्रेक्षक कुस्तीचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित होते.

श्री संतोष कदम, श्री गणपत कदम, श्री बाजीराब कदम, श्री संतोष टेलर श्री सुभाष कदम आणि ग्रामस्थ यांनी कुस्ती फडाचे उत्तम नियोजन केले..

कुस्तीचे  समालोचन श्री संजय संकपाळ गुरुजी  यांनी उत्तम केले.  कुस्ती फड  पाहण्यासाठी  32 गाव समाजाचे अध्यक्ष धोंडिबा महाराज व समाजातील अनेक मान्यवर, गावोगावचे ग्रामस्थ उपस्थित होते  विभागातील  माजी पैलवान आणि वस्ताद यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!