Tue, Apr 21, 2026
कृषी वार्ता

शेतकरी आणि लोकांचा विश्वासू भागीदार म्हणून भारतीय अन्न महामंडळाने पुढे यावे : केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल

शेतकरी आणि लोकांचा विश्वासू भागीदार म्हणून भारतीय अन्न महामंडळाने पुढे यावे : केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री  पीयूष गोयल
Ashok Ithape
  • PublishedJanuary 15, 2024

मुंबई: १४ जानेवारी –

भारतीय अन्न महामंडळाने शेतकरी आणि देशातील जनतेचा विश्वासार्ह भागीदार म्हणून पुढे यावे असे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज एफसीआयच्या 60 व्या स्थापना समारंभाला संबोधित करताना सांगितले.

एफसीआय देशाच्या कानाकोपऱ्यातील लाभार्थ्यांना शिधा उपलब्ध करून देऊन प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना यासारख्या महत्वपूर्ण योजना सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते असे गोयल यांनी सांगितले. मात्र, एफसीआयची भूमिका ही केवळ शिधा वितरीत करणे नव्हे तर पारदर्शकता, कार्यक्षमता आणि दायित्व  आणून शेतकरी आणि लाभार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण करणे देखील आहे असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी भारताला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे असे केंद्रीय मंत्री म्हणाले. विकसित भारतच्या या वचनाची सुनिश्चिती करण्यासाठी, त्यांनी तरुणांना आणि एफसीआयच्या कर्मचार्‍यांना पारदर्शकता आणण्याचे आणि जागल्या बनण्याचे आवाहन केले.

प्राधान्यक्रमाच्या दुसऱ्या क्षेत्राबाबत गोयल म्हणाले की, एफसीआयला गुणवत्तेबरोबरच  डिजिटलायझेशन आणि तंत्रज्ञान स्विकारण्याची गरज आहे. तपासणी, खरेदी, वाहतूक, वितरण आणि साठवणूक यांसारख्या क्षेत्रात गुणवत्ता आणता येते. यांत्रिक लोडिंग/अनलोडिंग, नाविन्यपूर्ण साठवणूक संकल्पना आणि इतर गोष्टींचा अवलंब करत क्रियान्वयनाचा खर्च कमी करण्याची सूचनाही त्यांनी केली.

एफसीआयची खुली बाजार विक्री योजना (देशांतर्गत ) कार्यक्रम देखील ग्राहकांच्या फायद्यासाठी गहू आणि तांदूळ यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी एक प्रभावी माध्यम असल्याचे सिद्ध झाले आहे असे ते म्हणाले.

एफसीआयने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला वाजवी किंमत दिली आहे आणि कोणत्याही शेतकऱ्याने नुकसान सोसून मालाची विक्री करू नये याची काळजी घेतली आहे असे ते म्हणाले  महामंडळाने एकत्रितपणे शेतकऱ्यांशी संवाद वाढवण्याचे काम सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. एफसीआय ने आता उत्तम देखरेख, पायाभूत सुविधा सुधारत डिजिटलायझेशनचा अवलंब करणे, खरेदी प्रक्रिया सुव्यवस्थित करणे, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि उपकरणे उभारणे, अन्नधान्य खरेदी सुलभ करणे, चांगल्या साठवणुकीसाठी पोलादी भांडारगृहे बांधणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा आधुनिक युगात प्रवेश केला आहे असे गोयल यांनी सांगितले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!