छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथून भीमज्योत भिमाई भूमीमार्गे पणुंब्रेकडे मार्गस्थ.
सातारा l प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पणुंब्रे वारूण (ता. शिराळा, जि. सांगली) येथील सिद्धार्थ तरुण कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाचे कार्यकर्ते सातारा येथे ज्या शाळेत डॉ. बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण झाले, त्या छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथून भीमज्योत घेऊन जाण्यासाठी आज आले होते.
यावेळी शाळेच्या व्यवस्थापनाने त्यांना शाळेच्या रजिस्टरमधील बाबासाहेबांच्या शाळा प्रवेशाची नोंद दाखवली. ती नोंद व त्यावरील या महामानवाची स्वाक्षरी पाहून हे सर्व कार्यकर्ते अक्षरशः भारावून गेले.*
या ठिकाणी साहित्यिक – पत्रकार व शाळा प्रवेश दिनाचे प्रवर्तक अरुण जावळे यांच्या हस्ते भीमज्योत प्रज्वलित करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार महेंद्र जाधव (आबा) दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी श्री.गजानन चेणगे यांच्या उपस्थितीत ही भीमज्योत भिमाई भूमीमार्गे पणुंब्रेकडे मार्गस्थ झाली.
या भीमज्योतीसमवेत प्रदीप बनसोडे व मंडळाचे अनेक कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले आहेत.
विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे बाबासाहेबांचे शिक्षण झालेल्या या प्रतापसिंह हायस्कूलमधून भीमज्योत घेऊन जाण्याचा हा पहिलाच प्रसंग. या प्रसंगाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटला.*













