Sat, Apr 18, 2026
आरोग्य

किकली,ता.वाई येथे डॉ.स्वागत तोडकर यांचे व्याख्यान

किकली,ता.वाई येथे डॉ.स्वागत तोडकर यांचे व्याख्यान
Ashok Ithape
  • PublishedDecember 5, 2023

पाचवड (प्रतिनिधी):

वाई तालुक्यातील किकली येथे कोल्हापूर येथिल प्रसिद्ध आयुर्वेदिक अभ्यासक डॉ स्वागत तोडकर यांचे बुधवार दि.६ डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वा.किकली गावच्या परीसरातील वाड्यावस्तीवरील ग्रामस्थासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

किकली येथील ग्रामपंचायत पटांगणावर हे व्याख्यान होणार आहे. घरगुती निसर्गोपचार पध्दतीने निरोगी आयुष्य कसे जगायचे तणाव मुक्त आयुष्य व आनंदी जीवन औषध विना आरोग्य या विषयावर डॉ. स्वागत जी तोडकर हे बहुमूल्य मार्गदर्शन करणार आहेत.

धावपळीच्या जीवनात आपले जीवन योग्य व सुखी कसे करता येईल व आपल्याला शांतता कशी मिळेल या संदर्भात व्याख्यान असणार आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन संयोजक तथा उधोजक किरण बाबर यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!