Wed, Mar 4, 2026
आरोग्य योजना

आयुष्यमान भारत दैनंदिन ई-कार्ड नोंदणीत सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर

आयुष्यमान भारत दैनंदिन ई-कार्ड नोंदणीत सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर
Ashok Ithape
  • PublishedOctober 31, 2023

सातारा , दि. 31 (जिमाका):

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार सातारा जिल्हा आयुष्यमान भारत दैनंदिन ई-कार्ड नोंदणीमध्ये मागील 6 दिवसांमध्ये राज्यात अग्रेसर ठरला आहे. मागील 30 दिवसात 1 लाख 39 हजार 35 तर मागील 7 दिवसात 88 हजार 846 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना या दोंन्ही योजनेमध्ये 17 लाख 62 हजार 900 लाभार्थ्यांचा समावेश असून त्यापैकी 8 लाख 2 हजार 859 इतके लाभार्थी आयुष्मयान भारत योजनेतील तर 9 लाख 60 हजार 41 इतके लाभार्थी महात्मा ज्योतिराव फुले योजनेतील आहेत.त्यापैकी आजअखेर 3 लाख 5 हजार 846 लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप करण्यात आले आहे.उर्वरित लाभार्थ्यांच्या नोंदणी व वितरणासाठी प्रशासनामार्फत शिबीरे घेण्यात येत आहेत.

जिल्ह्यामध्ये ई-कार्ड नोंदणीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून नागरिकांनी ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र व जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवक, परिचारिका, आशा सेविका यांच्याकडे आधार कार्ड देऊन नोंदणी करावी. त्याचबरोबर लाभार्थ्यांनी स्वत:च्या ॲन्ड्राईड मोबाईलमध्ये प्ले-स्टोअरमधून आयुष्यमान भारत ॲप घेऊन त्याद्वारेही नोंदणी करावी, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!