Sat, Jun 13, 2026
Close

Recent Posts

प्रशासन

यंत्रणांनी वृत्तपत्रांच्या जाहिरातींची देयके एक महिन्यात अदा कराजेड – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

यंत्रणांनी वृत्तपत्रांच्या जाहिरातींची देयके एक महिन्यात अदा कराजेड – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Ashok Ithape
  • PublishedOctober 26, 2023

सातारा, दि.26 (जिमाका):

सर्व शासकीय यंत्रणांनी दैनिकांच्या जाहिरातींची देयके एक महिन्याच्या आत अदा करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात दैनिकांच्या प्रलंबित देयकांबाबत बैठक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शिवाजीराव जगताप, सतिश धुमाळ, जिल्हा खणिकर्म  अधिकारी अमोल थोरात, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जाहिरातींच्या देयके अदा करण्यासाठीचा निधी उपलब्ध नसल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले,  या बैठकीत असे निदर्शनास आले आहे की, एक विभाग जाहिरात देतो आणि देयके दुसरा विभाग अदा करील असे आदेशित करतो यामध्ये बदल करण्यात येऊन जे विभाग जाहिरात देतात त्याच विभागाने जाहिरातीचे देयक अदा करावेत.

शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे यांनी शासनमान्य यादीवरील दैनिकांना रोटेशन पद्धतीनुसार जाहिराती वितरीत कराव्यात. या नियमाचे काटेकोर पालन करावे. दैनिकांच्या प्रतिनिधींनीही संबंधित यंत्रणांशी भेटून जाहिरात देयकांची पडताळणी करावी व देयक अदा झाले आहे किंवा कसे याची खात्री करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीत बऱ्याच काळापासून प्रलंबित असणाऱ्या वर्तमानपत्रांच्या जाहिरात देयकांची आढावा घेण्यात आला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!