Mon, Mar 2, 2026
प्रशासन सातारा जिल्हा

कास पठारावरील जमीन विक्रीबाबतच्या खोट्या प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन – तहसीलदार राजेश जाधव

कास पठारावरील जमीन विक्रीबाबतच्या खोट्या प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन – तहसीलदार राजेश जाधव
Ashok Ithape
  • PublishedOctober 23, 2023

सातारा (जिमाका) दि.23:

दसरा – दिवाळी सन २०२३ च्या निमित्ताने जमीन विक्रीबाबत आकर्षक जाहीराती व खोट्या प्रलोभनाला नागरीकांनी बळी पडू नये, असे आवाहन सातारा तहसिलदार राजेश जाधव यांनी केले आहे.

काही व्यक्ती / संस्था दसरा – दिवाळी सन २०२३ च्या निमीत्ताने कास पठारावरील जागा जमीन विक्रीबाबत आकर्षक जाहीराती देत आहे. याबाबत जमीन, प्लॉट घेणेपूर्वी सदर जमीन बिनशेती करणेसाठी सक्षम प्राधिकारी यांची परवानगी तसेच त्यानुषंगाने करणेच्या अटी व शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे अगर कसे, याची शहानिशा करावी, अन्यथा भविष्यात निर्माण होणा-या कायदेशीर बाबींना आपण स्वतः जबाबदार रहाल, असे तहसीलदार सातारा यांचेकडून सर्व नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!