Wed, Oct 21, 2026
साहित्य

वाईचे साहित्यिक-कवी डॉ. जनार्दन भोसले यांना राज्यस्तरीय ‘ज्येष्ठ कवी वसंत बापट साहित्य गौरव’ पुरस्कार

वाईचे साहित्यिक-कवी डॉ. जनार्दन भोसले यांना राज्यस्तरीय ‘ज्येष्ठ कवी वसंत बापट साहित्य गौरव’ पुरस्कार
Ashok Ithape
  • PublishedOctober 6, 2026

वाई, दि. ५ (प्रतिनिधी) : बावधन (ता. वाई) येथील साहित्यिक व कवी डॉ. जनार्दन भोसले यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ‘ज्येष्ठ कवी वसंत बापट साहित्य गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

रानकवी प्रतिष्ठान आणि ज्ञानाई फाउंडेशन, कळस साहित्य विचार मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १०० व्या राज्यस्तरीय पुणे मराठी काव्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वानवडी येथील महात्मा फुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते डॉ. भोसले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ललिता सबनीस, गझलकार म. भा. चव्हाण यांच्यासह साहित्य, कला व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या काव्य संमेलनाचे आयोजन जगदीप वनशिव आणि कवी सीताराम नरके यांनी केले होते. पिंपरी-चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नगरसेवक निवृत्ती आण्णा बांदल, प्रा. डॉ. शैलेंद्र बनगे, अभिनेत्री प्रीती पोळ, अभिनेते गुलाबराजा फुलमाळी, कवी, वाचक व साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. जनार्दन भोसले यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत दोन राष्ट्रीय पुरस्कार, दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार, २५ राज्यस्तरीय पुरस्कार तसेच ३० काव्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या तीन शोधनिबंधांचेही प्रकाशन झाले आहे.

बावधनसारख्या ग्रामीण भागातून साहित्य क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. भोसले यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल साहित्यिक, कवी, रसिक व वाई तालुक्यातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!