ओमसाई को-ऑप क्रेडिट सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात संपन्न
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; सभासद, ठेवीदारांच्या विश्वासामुळे संस्थेची उल्लेखनीय प्रगती – अध्यक्ष बाबासाहेब जाधव
मुंबई : ओमसाई को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., मुंबईची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच श्री सत्यनारायण महापूजा सोहळा दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी सभासदांच्या गुणवंत मुला-मुलींचा विशेष गुणगौरव करण्यात आला.
सभासदांच्या इयत्ता एकवीपासून पदवीपर्यंतच्या शिक्षणात ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष तथा समाजभूषण श्री. बाबासाहेब भीमराव जाधव (आबा) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुणगौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष बाबासाहेब जाधव म्हणाले, “ओमसाई को-ऑप क्रेडिट सोसायटीवर निरंतर विश्वास ठेवणाऱ्या सर्व सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांचे मनःपूर्वक आभार. सरत्या आर्थिक वर्षात विविध आव्हानांचा सामना करत संस्थेने उल्लेखनीय प्रगती केली असून व्यवसायात समाधानकारक वाढ झाली आहे. संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम यामुळे ही प्रगती साध्य झाली आहे. सभासदांचा विश्वास व सहकार्य यापुढेही कायम राहील, असा विश्वास आहे.”
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष राजेश शामराव जाधव, संचालक सुनील बाबासाहेब चाळके, संदीप लक्ष्मण निवडुंगे, संदीप तानाजी गुंजावले, रघुनाथ मारुती घारे, संजना सुधीर करपे, उषा राजेश कदम, शिवाजी विठ्ठल लोहार, जयेश सखाराम गुरव, तसेच संचालक रामचंद्र ज्ञानदेव साठे उपस्थित होते.
यावेळी कायदेविषयक सल्लागार ॲड. युवराज निवृत्ती बोत्रे (उच्च न्यायालय), ॲड. विकास नाना तांबेकर (उच्च न्यायालय), लेखापरीक्षण विभागातील संतोष रामचंद्र चाळके, रमेश सर्जेराव जाधव, शिवाजी रत्नाजी पाटील, शासकीय लेखापरीक्षक ए. बी. मोहिते अँड असोसिएट्स, महाव्यवस्थापक संदीप यशवंत चोरमारे, लिपिक सागर वसंत पाटील आणि सौ. सोनाली सचिन शिंदे यांच्यासह सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराड – मस्जिद बंदर शाखेच्या शाखा व्यवस्थापक सौ. सुरेखा गंगावणे, अधिकारी सौ. वैशाली जगताप आणि लिपिक सौ. आरती माने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष बाबासाहेब जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, संस्थेची आर्थिक प्रगती आणि सभासदांच्या विश्वासाचा गौरव अशा उत्साहपूर्ण वातावरणात वार्षिक सभेची सांगता करण्यात आली.





















